ही मोर्चे काढण्याची वेळ नाही; संभाजीराजेंची भूमिका सकारात्मक

Sambhaji Raje

पुणे :- मराठा आरक्षण (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) रद्द केल्यामुळे मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे काढण्यासाठी सध्याची वेळ योग्य नाही. त्यामुळे मराठा समाजातील जाणकार, विद्वान आणि वकिलांशी चर्चा करूनच मी माझी पुढची भूमिका ठरवेन. माझी भूमिका ही सकारात्मक असेल, असे वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कालच संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी ट्विट करून आपण लवकरच मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले होते.

मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे मी तसे ट्विट केले. आता सर्व लोकांशी सविस्तर चर्चा करुन मी माझी भूमिका मांडेन, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. माझी भूमिका ही शिवाजी महाराज, शाहू महाराजांची भूमिका असेल. त्याच्या राजकीय पक्षांशी कोणताही संबंध नसेल. ती समस्त मराठा समाजाची भूमिका असेल, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आढावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button