त्यांना न विचारता जागा सेनेला दिली? संभाजी पाटील निलंगेकरांचे आरोप तथ्यहीन – अमित देशमुख

 Sambhaji Patil Nilangekar's allegations are baseless - Amit Deshmukh

लातूर :  महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन वर्ष उलटून गेलं मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणूक अजूनही या ना त्या कारणाने सतत चर्चेत येत असते. आता लातूरच्या ग्रामीणच्या जागेवरून संभाजी निलंगेकर पाटील (Sambhaji Patil Nilangekar) यांनी भाजप, शिवसेना, कॉंग्रेसवर जागा बाय म्हणून दिल्याचा आरोप केला. यावर आता कॉंग्रेसचे लातूरचे नेते, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी निलंगेकर पाटील यांनाच उलट प्रश्न केला आहे.

अमित देशमुख म्हणाले, ”संभाजी पाटील निलंगेकरांचे आरोप तथ्यहीन आहेत, ज्यांनी हा आरोप केलाय, गौप्यस्फोट केलाय, त्यांनाच यातील सत्यता विचारायला हवी. महायुती म्हणून निवडणुका त्या काळामध्ये लढवल्या गेल्या. भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसशी फिक्सिंग केल्याचं मी ऐकलं, आता भाजपच्या नेत्यांनीच यातील तथ्य सांगावं. महायुतीत जे जागावाटप झालं, ते भाजप आणि शिवसेनेत झालं होतं. त्यामुळे आता असा काही आरोप करणं योग्य नाही.

कुठली जागा कुठल्या पक्षाला सोडायची हे त्यावेळी त्या नेत्यांनी ठरवलं. लातूर ग्रामीणची जागा शिवसेनेला सोडण्यात आली, त्यावेळी संभाजी पाटील निलंगेकर पालकमंत्री होते. त्यामुळे मला वाटत नाही, त्यांना विचारल्याशिवाय जिल्ह्यातील भाजपची जागा शिवसेनेला दिली असेल. त्या काळात संभाजी पाटील निलंगेकर पालकमंत्री होते. जिल्ह्यातील एखादी जागा पालकमंत्र्यांच्या नाहरकतीवर दिली असेल, तर यावर कोणाचा विश्वास बसणार आहे. राज्यातील हे सगळे प्रमुख पक्ष आहेत, त्यामुळे पक्ष फिक्सिंग करतात असं म्हणण्यात अर्थ नाही. त्यांनी हे का उकरून काढलंय हे तेच सांगू शकतात, असं सांगत देशमुखांनी उलटपक्षी निलंगेकरांनाच हे प्रश्न उपस्थित केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER