खासदार संभाजी छत्रपती नवीन पक्ष स्थापन करणार? उलटसुलट चर्चा रंगल्या

Sambhaji Raje Chhatrapati

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे . मराठा आरक्षणासाठी भाजपचे खासदार संभाजी छत्रपती (MP Sambhaji Chhatrapati) यांनी राज्यभर दौरे सुरू केले आहेत. यावेळी मराठा समाजाच्या भावना जाणून घेतानाच काही कायदेतज्ज्ञांशीही त्यांनी चर्चा केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सर्व पक्षीय नेत्यांशी भेटीगाठी सुरू करून मराठा आरक्षणाबाबतच्या पर्यायांची चर्चा सुरू केली आहे. या नेत्यांशी भेटीगाठी केल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे संभाजीराजेंनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ते नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात प्रस्थापित पक्षांना येत असलेले अपयश बघून आता समाजामधील प्रमुख लोक संभाजीराजेंनी नवीन पक्ष काढावा असा आग्रह धरत आहेत. सर्वसामान्य जनता संभाजीराजांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहील असे त्यांना वाटते. शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांना सर्वच जाती-धर्माचे लोक मानतात. संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या चळवळींचे नेतृत्व करत असले तरी सर्व बहुजन समाजाला एकत्र घेऊन जाण्याची त्यांची भूमिका राहिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button