समाधान आवताडेंचा विजय महाविकास आघाडीच्या थोबाडीत मारल्यासारखा; चंद्रकांत पाटलांची मविआवर टीका

Chandrakant Patil - Mahavikas Aghadi - Maharashtra Today
Chandrakant Patil - Mahavikas Aghadi - Maharashtra Today

पुणे : देशात ५ विधानसभा निवडणुकांच्या निकालासह पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी झाली. यात भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचीच बाजी मारली. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवळणुकीत समाधान आवताडे हे ३ हजार ७१६ मतांनी विजयी झाले. या विजयामुळे भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या विजयाविषयी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर खोचक टीका केली. त्यांनी समाधान आवताडे यांचा विजय हा महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) थोबाडीत मारल्यासारखा आहे, असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) भाष्य केले.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र मैदानात उतरले होते. तिन्ही पक्षांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या विजयासाठी कसोशीने प्रयत्न केला होता. मात्र, मतमोजणीत पंढरपूरमध्ये भाजपचे उमेदवार समाधान आवताडे आघाडीवर राहून ते ३ हजार ७१६ मतांनी विजयी झाले. यावर चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. समाधान आवताडे याचा विजय हा महाविकास आघाडीला थोबाडीत मारल्यासारखे आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

फडणवीस जे बोलतात ते करतात

भाजप यानंतरच्या सर्व निवडणुकीत संघटनात्मक पद्धतीने काम करणार आहे. “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते करून दाखवतात. ५ राज्यांच्या निकालामुळे काँग्रेस पक्ष शून्य आणि अस्तित्वहीन झाला आहे. पुढच्या निवडणुकीतसुद्धा आम्ही संघटनात्मक पद्धतीने काम करणार.” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button