समाधान आवताडेंची 15 व्या फेरीअखेर मोठी आघाडी ; 3800 मतांनी पुढे

Maharashtra Today

मुंबई :राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके(Bharat Bhalke) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक पार पडली . आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे . त्यामध्ये, महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालकेंनी आघाडी घेतली होती. मात्र, नवव्या फेरीअखेर भाजपाच्या समाधान अवताडेंनी(Samadhan Awatade) भालकेंना मागे टाकले आहे.15 वी फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे ३८०० मतांनी आघाडीवर आहे .

नवव्या आणि दहाव्या फेरीचा निकाल हाती आल्यानंतरही समाधान आवताडेंनी आघाडी घेतल्याचं दिसून येतंय. आवताडे यांना नवव्या फेरीअखेर 2357 मतांची आघाडी मिळाली होती. तर, दहा फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर समाधान आवताडेंना 1838 मताची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे, येथील निवडणुकीत चांगलीच चूरस पाहायला मिळत आहे. ज्या भागात राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांना मताधिक्याची अपेक्षा होती, त्याच भागात समाधान आवताडे यांनी चांगली मुसंडी घेतली आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button