सॅल्यूट पवार साहेबांना २२ वर्षे पक्ष चालविला कॅन्सरला दिला खो!

NCP - Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) बाविसवा वर्धापन दिनाचा कार्यक्रम गुरुवारी झाला. ८० वर्षांचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सडेतोड विचार मांडले. २२ वर्षांनंतरही आपली पक्षावर मजबूत पकड असल्याचे या वयोवृद्ध नेत्याने दाखवून दिले. गेली जवळपास दोन दशके पवार हे कर्करोगाचा यशस्वी सामना करीत आहेत. कर्करोग अच्छाअच्छांना हरवितो, पवारांसारख्या पहाडी नेत्याने आजवर कर्करोगाला हरविण्याचे काम प्रबळ इच्छाशक्तीच्या भरवश्यावर केले आहे.

१९७८ मध्ये राज्यातील पहिले बिगर काँग्रेसी सरकार शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्थापन केले तेव्हा ते केवळ ३८ वर्षांचे होते. राज्याचे आजवरचे सर्वात तरुण मुख्यमंत्री हा रेकॉर्ड आजही त्यांच्याच नावावर जमा आहे. पवारांच्या वयाचे अनेक नेते थकले वा हयात नाहीत पण ‘अजूनी चालतोची वाट’ या न्यायाने पवार चालतच आहेत. राष्ट्रवादीतील नव्या दमाचे नेते आता चांगले काम करत आहेत असे सूचक उद्गार काढताना शरद पवार यांनी नव्या शिलेदारांना भविष्यात चांगली संधी दिली जाईल असेही सूचित केले.

प्रचंड कार्यक्षमता ही पवार यांना गॉड गिफ्ट आहे. देशाचे कृषी मंत्री असताना ते एकदा आपल्या दालनात बसले होते आणि त्यांना खोकल्याची उबळ आली, टेबलवर थोडे रक्त सांडले. ते त्यांनी पुसले आणि तसेच काम करीत राहिले हा अनुभव त्यांच्यातील दुर्दम्य इच्छाशक्तीचा पुरावाच.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी संपली, पवार संपले असे समजणाºयांचा भ्रमनिरास झाला. सातारा जिल्ह्यातील मुसळधार पावसात पवारांनी दिलेले भाषण गाजले आणि त्यांना प्रचंड सहानुभूती देऊन गेले. राज्यात शरद पवार एकच आहे आणि आजही त्याच्या ठायी तोच दम आहे हे पवार यांनी सिद्ध केले ते विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर. अशक्यप्राय अशी महाविकास आघाडी त्यांनी घडवून आणली. शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी आणि काँग्रेस (Congress) या तीन विचारांच्या तीन पक्षांची मोट त्यांनी बांधली आणि भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यात ते यशस्वी झाले. महाविकास आघाडी सरकारचे  (Mahavikas Aghadi) ते शिल्पकार ठरले.

आजही कर्करोग अधुनमधून डोके वर काढतो आणि पवार त्याला दम देतात, मागे सारतात व पुढेच पुढे चालू लागतात. महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा तर इगो ठेवून चालणार नाही याचे अचूक भान ठेवत ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आपल्याला येऊन भेटतील वगैरे कोणतीही वाट न पाहता वर्षावर पोहोचतात आणि ठाकरेंशी सल्लामसलत करतात. त्यात त्यांना कसलाही कमीपणा वाटत नाही. महाराष्ट्राच्या या महानेत्याने आपली मांड अजूनही पक्की असल्याचे अनेक प्रसंगांमधून दाखवून दिले आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक संदर्भ आणि समीकरणांचे अचूक भान असलेला हा नेता आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील जातीय समीकरणांचा त्यांचा अचूक अभ्यास आहे. अजूनही त्यांची चौफेर दृष्टी कायम असून राजकीय परिस्थितीचे सर्वात आधी आकलन त्यांनाच होते व त्यानुसार सर्वात आधी रणनीती तेच आखतात व अमलातदेखील आणतात. आपापल्या भागात प्रभाव असलेल्या नेत्यांचा एकत्रित पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. घरातल्यांपासून अनेक महत्त्वाकांक्षी नेते पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत पण सगळ्यांना सांभाळून व सामावून घेत पवार अत्यंत यशस्वीपणे त्यांचे नेतृत्व करतात. कोणाच्या महत्त्वाकांक्षेला कुठे वेसण घालायची आणि कोणाला कुठे किती महत्त्व द्यायचे याचे अचूक भान पवारसाहेबांना आहे. ते खºया अर्थाने महाराष्ट्राचे महानेते आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button