शहनाज नंतर दिसले ‘गंगूबाई’ चे शॉकिंग ट्रांसफॉर्मेशन

saloni Danny aka Gangubai Look Transformation after Shahnaz Gill.jpg

बिग बॉस फेम शहनाज गिलचा (Shahnaz Gill) लूक ट्रान्सफॉर्मेशन (Look Transformation) नुकताच सोशल मीडियावर ट्रेंड झाला होता. आता दुसर्‍या कलाकाराच्या लूकची चर्चा सुरू आहे. आम्ही बाल कलाकार सलोनी डैनी (Saloni Danny) उर्फ गंगूबाईबद्दल बोलत आहोत. सलोनीने तिच्या लूकमध्ये झालेल्या ट्रान्सफॉर्मेशनची छायाचित्रे शेअर करुन सर्वांना चकित केले आहे.

कॉमेडी सर्कस महासंग्राममध्ये गंगूबाईची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेल्या सलोनीचा गेल्या काही वर्षांत वजन खूप वाढलं. ज्यानंतर तिने आता लुकमध्ये हा करिष्माई बदल केला आहे.

सलोनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या नवीन लूकची फोटो शेअर केली आहेत. मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत सलोनीने ही फोटो काढली आहेत.

गंगूबाईच्या लूकमध्ये हा जबरदस्त बदल पाहून तिचे चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये तिचे कौतुक करत आहेत. एका युझरने लिहिले आहे की तुझ्या लूकमध्ये हा बदल पाहून त्यावर विश्वास बसत नाही.

आतापर्यंत ती बर्‍याच टीव्ही शो आणि हिंदी-मराठी चित्रपटांचा एक भाग राहिली आहे. शहनाज गिलबद्दल सांगायचे तर, शहनाजने आपल्या आहारातील (Diet) बदलांद्वारे आपल्या लूकमध्ये एक अद्भुत बदल घडवून आणला आहे, ज्याची छायाचित्रे यापूर्वी व्हायरल झाली होती.

सलोनी सर्वात तरुण कॉमेडियन मानली जाते, कारण तिने वयाच्या फक्त तिसऱ्या (३) वर्षी विनोद शिकण्यास व करण्यास सुरुवात केली. ती काजोल, सोनम कपूर आणि इतर बर्‍याच जणांच्या मिमिक्रीमध्ये माहिर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER