‘बिग बॉस-१४’साठी सलमानला मिळणारी रक्कम पाहून डोळे होतील पांढरे

Bigg Boss 14

कलर्सवर आता लवकरच ‘बिग बॉस-१४’ (Bigg Boss 14) सुरू होणार आहे. सलमान खान (Salman Khan) होस्ट करीत असलेल्या या शोची टीव्ही जगतात प्रचंड चर्चा सुरू झाली आहे.  गेल्या सीझनमध्ये सिद्धार्थ शुक्लाने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली होती. लॉकडाऊनमध्ये सलमानने या शोसाठी आपल्या पनवेल येथील फार्म हाऊसवर प्रोमो शूट केले होते. सलमान खानच्या अदाकारीमुळे बिग बॉसचे सर्व सीझन चांगलेच लोकप्रिय झाले आहेत.

सलमानमुळेच बिग बॉसच्या प्रत्येक सीझनची प्रेक्षक वाट पाहात असतात. त्याचा ‘वीकेंड का वॉर’ चांगलाच लोकप्रिय आहे. आपल्या या लोकप्रियतेची सलमान पुरेपूर किंमत वसूल करीत आहे आणि चॅनेलही त्याला ही रक्कम देण्यास तयार झाले आहे. आता तुमच्या मनात उत्सुकता निर्माण झाली असेल की, चॅनेल सलमानला असे किती पैसे देत आहे? तर आम्ही तुम्हाला जी रक्कम सांगणार आहोत ती वाचून दोन वेळा तरी नक्कीच डोळे चोळाल.

१२ आठवड्यांच्या या शोसाठी सलमानला मिळणारी ही रक्कम आहे जवळ जवळ २५० कोटी रुपये. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक एपिसोडसाठी सलमान खान १०.२५ कोटी रुपये घेणार आहे. आणि प्रत्येक आठवड्यात दोन एपिसोड तो शूट करणार आहे. याशिवाय चॅनेलच्या अन्य कार्यक्रमांमध्येही  त्याला भाग घ्यावा लागणार आहे. चॅनेलने तसे काँट्रॅक्टच सलमानशी केले असल्याचे सांगितले जात आहे.  फिल्मसिटीमध्ये यासाठी नवा सेट लावला जाणार असून ऑक्टोबरमध्ये याचे शूटिंग सुरू होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER