
आज सलमान खानचा (Salman Khan) 55 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त वांद्रे येथील त्याच्या घराच्या समोर फॅन्सची प्रचंड गर्दी होते. सलमान खान गॅलरीत येऊन फॅन्सचे अभिवादन स्वीकारतो. मात्र यावेळी प्रथमच सलमान खानने फॅन्ससोबत वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. कोरोनाची (Corona) साथ कायम असल्याने त्याने घरासमोर न येण्याचे आणि गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी त्याने एक नोटीसही घरासमोर लावली आहे.
खरे तर सलमान त्याच्या वाढदिवसाला क्वचितच घरी असतो. त्याच्या कर्जतमधील फार्महाऊसवर तो वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटुंब आणि मित्रांसह जात असतो. फार्म हाऊसवरच वाढदिवस आणि नवीन वर्षाचे स्वागत करून तो मुंबईला परतत असतो. यावेळी तो घरी राहाणार नाही. आणि हेच त्याने नोटीसमध्येही सांगितले आहे.
सलमानने इमारतीबाहेरील नोटीसमध्ये लिहिले आहे, “माझ्या वाढदिवसानिमित्त माझे फॅन्स माझ्यावरील त्यांचे प्रेम व्यक्त करायला येतात. गेल्या अनेक वर्षांपासून हे होत आहे. परंतु यावेळी माझी विनम्र प्रार्थना आहे की, यावेळी कोरोनाची साथ आणि सोशल डिस्टंसिंग लक्षात ठेऊन माझ्या घरबाहेर गर्दी करू नये. मास्क लावा, सॅनिटाईज करा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. यावेळी मी घरी गॅलेक्सीमध्ये नाही असेही सलमानने या नोटीसमध्ये लिहिले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला