अबब सलमान एका चित्रपटासाठी घेणार 100 कोटी

सलमान खान (Salman Khan) सध्याचा बॉलिवुडमधील (Bollywood) खराखुरा सुपरस्टार आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्याच्यासाठी कितीही पैसे मोजण्यास निर्माते तयार होत आहेत. यावरून निर्मात्यांचा त्याच्यावर किती विश्वास आहे ते दिसत आहे. एक था टायगर चित्रपट हिट ठरल्यानंतर टायगर जिंदा है ची निर्मिती झाली. हा चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर कमाईचा विक्रम केला. टायगरचाच आता तिसरा भाग तयार करण्याची योजना आखण्यात आली असून सलमान खानचा हा आतापर्यंतचा सगळ्यात महागडा चित्रपट असेल असे सांगण्यात येत आहे. सध्या सलमान खान आपल्या राधे चित्रपटाचे पुढील महिन्यात शूटिंग सुरु करून डिसेंबरमध्ये प्रदर्शित करणार आहे. या चित्रपटासोबतच टायगर 3 चा टीझर दाखवला जाण्याची शक्यता बॉलिवुडमध्ये व्यक्त केली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टायगर 3  (Tiger 3)चे बजेट जवळ-जवळ 400 ते 450 कोटी रुपये असणार आहे. यात केवळ पब्लिसिटीसाठीच 30 ते 35 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत आता आपण येऊया सलमान खानच्या मानधनाकडे. सलमान खानला या चित्रपटासाठी थोडीथोडकी नव्हे तर 100 कोटी रुपये दिले जाणार असून चित्रपटाच्या नफ्यातही त्याला वाटा दिला जाणार आहे. चित्रपटात कॅटरीनाच (Katrina) त्याची नायिका असणार आहे. हा चित्रपट पूर्वीच्या दोन्ही टायगरपेक्षा वेगळा असणार असून मिशन इम्पॉसिबल (Mission Impossible)प्रमाणे असेल आणि अनेक देशांमध्ये याचे शूटिंग केले जाणार आहे अशी माहितीही सूत्रांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER