सलमान करायचेय रोहित शेट्टीसोबत काम

Rohit Shetty - Salman Khan

सलमान खान (Salman Khan) म्हणजे बॉलिवुडमधील (Bollywood) यशाचा एक्का मानला जातो. त्याचे सिनेमा विचार करण्यास प्रवृत्त करणारे नसतात तर फूल टू मनोरंजन करणारे असतात. त्याचे चित्रपट कोट्यावधींची उड्डाणे करीत असतात. प्रेक्षकांमध्ये त्याची असलेली ही इमेज लक्षात घेऊन त्याच्यासाठी अशाच सिनेमांची निर्मिती केली जाते. सलमानही त्याच्या प्रशंसकांना नाराज करीत नाही.

सलमान नायक म्हणून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असतानाच सलमानप्रमाणेच यशस्वी दिग्दर्शक रोहित शेट्टीही (Rohit Shetty) मसाला सिनेमे बनवून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आला आहे. रोहित शेट्टीच्या यशाची टक्केवारी पाहिली तर ती जवळ जवळ 99 टक्क्यांच्या आसपास भरते. अजय देवगणसोबत काम करणाऱ्या रोहित शेट्टीने शाहरुखसोबत ‘चेन्नई एक्सप्रेस’ सारखा सुपरहिट मसाला सिनेमा दिला होता. रणवीर सिंह, अक्षयकुमारसोबतही रोहित शेट्टी सिनेमे करीत आहे. पण त्याने अजूनपर्यंत सलमान खानसोबतच काम केलेले नाही. मात्र आता ही जोडी एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि याला कारण ठरले आहे सलमानचे एक वक्तव्य.

काही दिवसांपूर्वी सलमान खानला एका मुलाखतीत रोहित शेट्टीसोबत काम करणार असल्याच्या बातम्यांबाबत विचारले असता, सलमानने म्हटले होते, त्या बातम्या खऱ्या आहेत. अफवा नाहीत. मी स्वतः रोहितसोबत काम करण्यास इच्छुक आहे. रोहित शेट्टीसोबत माझे बोलणेही झाले आहे. पण अजून काहीही नक्की झालेले नाही. असेही सलमानने सांगितले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान आणि रोहितचे एकत्र येण्याबाबत बोलणे झाले असून रोहित सलमानसाठी एका चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात आहे. अॅक्शनपॅक्ड मनोरंजन करणारा हा चित्रपट असेल आणि कदाचित सलमान यात इन्स्पेक्टरच्या भूमिकेत असेल असेही सांगितले जात आहे. या चित्रपटाची निर्मिती रोहित शेट्टी आणि सलमान खान मिळून करणार असल्याचेही म्हटले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER