‘फ्रेश’ सॅनिटायझर : सलमान खानचा नवा उद्योग

Salman Khans new business- Fresh sanitizer for sale

मुंबई :- देशात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. या दरम्यान बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आता चक्क सॅनिटायझर विकताना दिसत आहे.

सलमानने ‘फ्रेश’ (FRSH) नावाची एक कंपनी सुरू केली आहे. या कंपनीचे बॉडी स्प्रे, परफ्युम, साबण, सौंदर्य प्रसाधने अशा प्रकारचे अनेक प्रॉडक्ट लवकरच बाजारात येतील. परंतु सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सलमान केवळ सॅनिटायझरची विक्री करत आहे. या कंपनीबाबत अधिक माहिती देण्यासाठी सलमानने एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

दरम्यान सलमान सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. अलीकडेच त्याची दोन गाणी सोशल मीडियावर प्रदर्शित झाली होती. या गाण्यांना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.Web Title : ‘Fresh’ Sanitizer – Salman Khan’s new business

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER