वादग्रस्त टॅलेंट कंपनीसोबत सलमान खानची भागीदारी ? वकिलाकडून खुलासा

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या (Sushant Singh Rajput death case) चौकशीत बॉलिवुडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या . यामध्ये मोठमोठ्या सेलिब्रिटींची नाव येत आहेत. दीपिका पादुकोण (Deepika Padukone), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), सारा अली खान  (Sara Ali Khan) आणि रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) यांचे नाव मुख्य रुपात समोर आली आहेत. यामध्ये सलमान खानच्या (Salman Khan) नावाची देखील चर्चा आहे . ड्रग्ज वादात फसलेल्या क्वान टॅलेंट कंपनीमध्ये सलमान खानच्या कंपनीचे देखील भागीदारी असल्याची माहिती समोर आली आहे .

सलमान खानच्या लीगल टीमने आपले स्टेटमेंट जाहीर केले . मीडियाच्या एक भाग चुकीच्या पद्धतीने बातमी दाखवत आहे. क्वान टॅलेंट मॅनेजमेंट एजेंसी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सलमान खानचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रुपात काही संबंध नाही. मीडिया आमच्या क्लाईंटबद्दल चुकीच्या बातम्या पसरवत आहे. असे यात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER