सलमान खानच्या सल्ल्यामुळे कश्मीरा शहाचे आयुष्य बदलले

Kashmera-Salman Khan

कश्मीरा शहा  टीव्ही आणि बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीमध्ये अभिनय करण्याबरोबरच तिच्या जबरदस्त नृत्यासाठीही ओळखली जाते. अलीकडेच  कश्मीरा (Kashmira) बिग बॉस-१४ मध्ये  (Bigg Boss)  अल्पावधीसाठी दिसली होती,
मात्र अल्पावधीतच तिने बरीच वाहवा मिळवली. इतकेच नाही तर ती बोल्ड फोटोशूटबाबतही चर्चेत आहे.  तिचे हे फोटो तिचा नवरा कृष्णा अभिषेकने सोशल मीडियावर शेअर केले आहेत, असे सांगितले जाते.  कश्मीराचा  नवरा कृष्णावर खूप प्रेम करतो  आणि या जोडप्याने वैयक्तिक आयुष्यातही खूप त्रास घेतला आहे.

मात्र, त्यावेळी सलमान खानने (Salman Khan)  कश्मीराला  खूप मदत केली होती. तिचे इंडस्ट्रीत  नाव आहे.  ती बर्‍याचदा  वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेत राहते. कृष्णा हा  कश्मीराचा  दुसरा पती आहे. या दोघांचे २०१३ साली लग्न झाले होते.  कश्मीरा   आणि कृष्णाच्या प्रेमाची सुरुवात ‘पप्पू पास हो गया’ चित्रपटाच्या सेटपासून झाली. शूटिंगनंतरही दोघे अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसले होते. कृष्णापूर्वी  कश्मीराने ब्रॅड लिस्टरमॅनशी लग्न केले; पण २००७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर, ती कृष्णाबरोबर लिव्ह इनमध्ये राहू लागली.

२०१३ साली कृष्णा आणि कश्मीराचे  लग्न झाले; परंतु बर्‍याच दिवसांपर्यंत त्यांनी ही गोष्ट लपवून ठेवली. तथापि, काही काळानंतर कृष्णा आणि  कश्मीरा  यांनी आपला विवाह झाल्याचे जगाला सांगितले. लग्नानंतर बाळाला जन्म देताना या दोघांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.  कश्मीराच्या  म्हणण्यानुसार, नैसर्गिक मार्गाने गर्भवती होत नसल्यामुळे त्यांनी आयव्हीएफचा (In Vitro Fertilization (IVF)) देखील सहारा घेतला. तथापि,  हा प्रयत्नही अयशस्वी ठरला. त्यावेळी सलमान खानच्या सल्ल्याने  कश्मीराला  खूप मदत झाली होती. तिने  एका मुलाखतीत सांगितले होते की, मी गर्भवती होण्यासाठी १४ वेळा अयशस्वी प्रयत्न केले होते. यानंतर सलमान खानने  कश्मीराला  सरोगेसीचा सल्ला दिला. तो तिच्यासाठी प्रभावी ठरला. २०१७ मध्ये  कश्मीराला   जुळे झाले. सलमानच्या सल्ल्याबद्दल  कश्मीरा  नेहमीच त्याचे आभार मानते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER