सूरज बडजात्यासोबत नव्या सिनेमाची कथा लिहिली सलमान खानने

Salman Khan - Suraj Badjatya.jpg

सलमान खान (Salman Khan) हा बॉलिवुडचा केवळ अभिनेता नसून त्याच्या अंगात अनेक गुण भरलेले आहेत. तो चांगला चित्रकारही आहे आणि तो कधी कधी सिनेमाच्या कथाही लिहितो किंवा कथेमध्ये सहभागी होऊन सल्लेही देतो. यापूर्वी त्याने अनेक सिनेमांच्या कथा लिखाणात सहभाग नोंदवलेला आहे. ‘बागी’, ‘चंद्रमुखी’, ‘वीर’ या सिनेमांची कथा सलमान खाननेच लिहिली होती. यापैकी फक्त बागी सुपरहिट झाला होता. बाकी दोन्ही सिनेमे फ्लॉप झाले होते. ‘दबंग’ची कथा लिहिण्यातही सलमानने मदत केली होती. आता सलमान पुन्हा एकदा लेखक म्हणून पुढे येत असून यावेळी त्याने प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक सूरज बडजात्यासोबत (Suraj Badjatya) कथा लिहिली आहे.

सलमान खान आणि सूरज बडजात्या यांची चांगली मैत्री आहे. मैंने प्यार किया पासून जमलेली ही जोडी अजूनही कायम असून पाच वर्षांपूर्वी सलमान आणि सूरजने प्रेम रतन धन पायो हा सुपरहिट सिनेमा दिला होता. यात सोनम कपूर सलमान खानची नायिका होती. त्यानंतर सूरज आणि सलमान पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा सुरु होती. पण चांगली कथा नसल्याने या दोघांनी सिनेमाची घोषणा केली नव्हती. मात्र लॉकडाऊनच्या काळात सलमानने एक रोमँटिक स्टोरी डेव्हलप करण्यात सूरजची मदत केली आहे. एक लग्न झालेल्या जोडप्याची ही कथा आहे.

कथा फायनल झाल्यानंतर प्री प्रॉडक्शनचे काम सुरु केले जाणार आहे. सलमान खान सध्या बिग बॉस, आयुष शर्मासोबत अंतिम सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. त्यानंतर तो कभी ईद कभी दिवालीचे शूटिंग सुरु करणार आहे. त्यातच राधेच्या प्रमोशनमध्येही भाग घेणार आहे. त्यानंतर सलमान टायगर 3 च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्यामुळे 2022 पर्यंत सलमानकडे वेळ नसल्याने 2022 मध्ये सूरजच्या या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER