शाहरुखसोबत एका गाण्यात थिरकणार सलमान खान

Shahrukh Khan - Salman Khan

शाहरुख (Shahrukh Khan) आणि सलमान (Salman Khan) बॉलिवूडचे (Bollywood) अत्यंत लोकप्रिय स्टार आहेत. शाहरुखच्या प्रशंसकांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली असली तरी सलमानच्या फॅन्सच्या संख्येत मात्र दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. या दोघांना एकत्र बघणे प्रेक्षकांना खूपच आवडते. परंतु राकेश रोशनच्या ‘करण अर्जुन’ चित्रपटाव्यतिरिक्त हे दोघे कधीही एकत्र आले नाहीत. या दोघांना एकत्र घेऊन चित्रपट निर्माण करण्याचे काही प्रयत्न झाले परंतु ते यशस्वी झाले नाहीत. मात्र कधी शाहरुखच्या चित्रपटात सलमान खान पाहुणा कलाकार तर कधी सलमानच्या चित्रपटात शाहरुख पाहुणा कलाकार म्हणून दिसले होते. सलमान खान ने शाहरुखच्या ‘कुछ कुछ होता है’, ‘ओम शांती ओम’ आणि ‘झीरो’ चित्रपटात कॅमियो केला होता तर शाहरुखने सलमानच्या ‘हर दिल जो प्यार करेगा’ आणि ‘ट्यूबलाइट’मध्ये कॅमियो केला होता.

आता पुन्हा एकदा हे दोघे एकत्र दिसणार आहेत. मात्र यावेळीही संपूर्ण चित्रपटभर हे दोघे काम करणार नसून एका गाण्यात हे दोघे दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यशराज शाहरुख खानला घेऊन ‘पठाण’ची निर्मिती करीत आहे. या चित्रपटात जॉन अब्राहमही महत्वाची भूमिका साकारीत आहे. तर नायिका म्हणून दीपिकाला साईन करण्यात आलेले आहे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चित्रपटात एक असे गाणे तयार करण्यात येणार आहे जेथे सलमान शाहरुख खानबरोबर नाचताना दिसणार आहे. हे गाणे या चित्रपटातील हायलाईट गाणे असणार आहे. कदाचित या गाण्यात जॉन अब्राहमही दिसू शकेल असेही सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER