सलमान खान लग्नावर उघडपणे बोलला, म्हणाला- मी अश्या मुलीबरोबर लग्न करीन …

Salman Khan

बॉलिवूड (Bollywood) दबंग स्टार सलमान खान (Salman Khan) हा एक सेलिब्रेटी आहे ज्याला नेहमीच लग्नाबद्दल प्रश्न केले जातात. मैने प्यार किया या चित्रपटाने सलमानने इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले होते. तो नेहमीच लव्ह लाईफविषयी आणि रिलेशनशिपबद्दल, विशेषत: त्याच्या सह-कलाकारां सोबतच्या रिलेशनशिपबद्दल चर्चेत असतो. चाहत्यांनी बर्‍याच वेळा विचार केला होता की सलमानचे लग्न होईल, पण अभिनेत्याने असं म्हणत नेहमीचीच सुटका केली की लग्नानंतर पैशांचा अपव्यय होतो.

फिल्मफेअर मासिकाला (Filmfare Magazine) १९९० मध्ये मुलाखतीत सलमान खान लग्नावर उघडपणे बोलला. यात त्याने आयुष्यात मुलगी कशी हवी आहे आणि कोणत्या प्रकारची मुलगी शोधत आहे हे सांगितले होते. सलमान खान म्हणाला होता की, “मला माझ्यासारख्या मुलीशी लग्न करायचे आहे आणि मी तिला अश्या वस्तू देऊ शकेल जे तिच्या पालकांच्या घरी नाही.” हे तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा सलमान खानचे नाव संगीता बिजलानीशी संबंधित होते आणि तो संगीताशी असलेल्या त्याच्या संबंधाविषयी मोकळेपणाने बोलत असे.

सलमान खान लवकरच ‘राधे: यॉर मोस्ट वॉन्टेड भाई’ चित्रपटात दिसणार आहे. यावर्षी ईदच्या निमित्ताने सिनेमागृहात प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय सलमान खान सध्या ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER