कबीर बेदीच्या आत्मचरित्राचे कव्हर रिलीज केले सलमान खानने

Maharashtra Today

बॉलिवूड कलाकारांचे आयुष्य जितके झाकून ठेवलेले असते तेवढे चांगले असते. बॉलिवूडमध्ये पडद्यामागे अनेक घटना, गोष्टी घडत असतात. या गोष्टी, घटना बाहेर आल्या तर प्रचंड खळबळ उडू शकते. त्यामुळे अनेक कलाकार मनात असूनही स्वतःचे आत्मचरित्र लिहिण्याच्या भानगडीत पडत नाहीत. आणि आत्मचरित्र लिहिले तरी त्यात फक्त चांगल्याच गोष्टी लिहिलेल्या असतात. फक्त ज्यांच्याबाबत मनापासून वाईट लिहायचे असते त्यांचा उल्लेख त्या घटना सांगून केलेला असतो. पण अशा घटना फार कमीच आढळतात. कबीर बेदीचे (Kabir Bedi) आयुष्य एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणेच आहे. त्याची हॉलिवूडमधील कारकिर्द, त्याची प्रेम प्रकरणे, त्याचे लग्न अशा अनेक गोष्टी सतत चर्चिल्या गेल्या होत्या. याच कबीर बेदीने आता त्याचे आत्मचरित्र लिहिले असून नुकतेच सलमानच्या हस्ते त्याच्या या आत्मचरित्राचे कव्हर सलमान खानच्या (Salman Khan) हस्त रिलीज करण्यात आले. हे पुस्तक १९ एप्रिल रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे.

७५ वर्षीय कबीर बेदीच्या वडिलांचे नाव बाबा प्यारेलाल सिंह बेदी असून ते लेखक आणि फिलॉसॉफर होते. त्यांनी ब्रिटिश महिला फ्रेडासोबत लग्न केले होते. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातही त्यांनी भाग घेतला होता. कॉलेज पूर्ण केल्यानंतर कबीर बेदीने नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर काही हिंदी सिनेमात काम केल्यानंतर कबीर बेदीने लंडनला जाऊन तेथे काही नाटकांमध्ये कामे केली. हॉलिवूडमध्ये ‘सँडोकन’ मालिकेने त्याला प्रचंड ओळख आणि लोकप्रियता मिळवून दिली होती. एका बॉन्डपटासह हॉलिवूडच्या काही सिनेमांमध्येही कबीर बेदीने काम केले होते. सिनेमा, नाटक आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रात कबीर बेदीने मनसोक्त मुशाफिरी केली आहे. कबीर बेदीने आतापर्यंत चार लग्ने केली असून त्याला तीन मुलं आहेत.

कबीर बेदीने लिहिलेल्या त्याच्या आत्मचरित्राचे नाव ‘स्टोरीज आय मस्ट टेल: द इमोशनल लाईफ ऑफ ऍन अॅक्टर’ असे आहे. कबीर बेदीने पुस्तकाच्या कव्हरबाबत बोलताना सांगितले, कव्हरवरील माझा फोटो हा ७० च्या दशकात टेरी ओ निल या फोटोग्राफरने काढलेला आहे. या पुस्तकात ऑल इंडिया रेडिओपासून सुरुवात करून मॉडेलिंग नंतर नाटकं आणि नंतर सिनेमाचा प्रवास कसा झाला ते मी लिहिलेले आहे. तसेच मी ‘बीटल्स’ची मुलाखत माझ्या आयुष्यातीस टर्निंग पाँईट कसा ठरला याबाबतही सविस्तर लिहिले आहे. माझ्या कुटुंबाबातही मी या पुस्तकात लिहिले असून माझ्या या आत्मचरित्रावर सिनेमा किंवा वेबसीरीजही बनू शकते असंही कबीर बेदी म्हणाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button