हैदराबाद गँग रेप : ती माणसं नसून सैतान! सलमान खान संतापला

SALMAN KHAN

मुंबई :- तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादमध्ये एका महिला (पशुवैद्य) डॉक्टरवर बलात्कार करून तिला जाळून मारल्याची घटना घडली आहे. ही घटना उजेडात येताच देशभर खळबळ उडाली. सर्व स्तरांवरून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे . या घटनेनंतर अभिनेता सलमान खाननंही ट्विट करून संताप व्यक्त केला. पीडितेला न्याय मिळावा म्हणून आता कलाकारही पुढे सरसावले आहेत.

सोशल मीडियावरून अभिनेता सुबोध भावेनं संताप व्यक्त केला. तर, सलमान खाननं अन्यायाविरोधात उभं राहण्याचं आवाहन केलं आहे. “प्रियंका रेड्डीला न्याय मिळायला हवा. ज्यांनी हे कृत्य केलं ती माणसं नसून सैतान आहेत. यांच्याविरोधात लढायला आपण एकत्र यायला हवं. बेटी बचाओ हे फक्त कॅम्पेनपुरतं मर्यादित राहू नये. हीच वेळ आहे या अन्यायाविरोधात उभं राहण्याची.” अशी भावना सलमान खानने व्यक्त केली.

हैदराबाद बलात्कार व हत्या : छोट्याशा अवयवाच्या जोरावर यांना माज आलाय; सुबोध भावेचा संताप

दरम्यान पोलिसांना गुरुवारी पहाटे हैदराबाद-बेंगळुरू महामार्गावर शाहनगर (जि. रंग्गा रेड्डी) येथील पुलाखाली एका महिला डॉक्टरचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. रात्री घरी जाताना त्यांची दुचाकी पंक्चर झाली होती. त्यानंतर त्या एकट्या असल्याचे पाहून आरोपींनी हे कृत्य केले. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.