सलमान खानही जिमच्या व्यवसायात

सलमान खान (Salman Khan) बॉलिवुडमधील (Bollywood) प्रचंड लोकप्रिय आणि प्रचंड कमाई करणारा कलाकार आहे. त्याच्या प्रशंसकांची संख्याही कोट्यावधींच्या घरात आहे. चित्रपट निर्मिती करण्यासोबतच त्याने स्वतःचा बीईंग ह्युमन (Being Human) कपड्यांचा ब्रॅन्ड तयार केला. या संस्थेच्या माध्यमातून तो समाजसेवाही करतो.

त्याला व्यायामाची आवड असल्याचेही त्याने वेळोवेळी दाखवून दिले आहे. त्याच्यासारखी शरीरयष्टी बनवण्याचे स्वप्नही अनेक जण पाहात असतात. ही बाब लक्षात घेऊन सलमानने आता जिमच्या व्यवसायात उतरण्याचे ठरवले असून दिल्लीत त्याने स्वतःचे जिमही सुरु केले आहे. केवळ जिमच नव्हे तर जिमच्या उपकरणांच्या व्यवसायातही उडी घेतली आहे. सलमानने स्वतःच सोशल मीडिया आणि यूट्यूबवर एक व्हीडियो रिलीज करीत आपल्या या नव्या उपक्रमाची माहिती दिली आहे.

सलमानने आपल्या या नव्या उपक्रमासाठी ‘बीइंग स्ट्राँग’ असे नाव ठेवले आहे. सलमानने प्रदर्शित केलेल्या व्हिडियोमध्ये सलमान खान जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे. या व्हीडियोसोबत सलमानने, आपल्या भविष्यासाठी प्रत्येकाने आपल्या फिटनेसकडे लक्ष दिले पाहिजे. स्वस्थ शरीर, स्वस्थ मेंदू आणि स्वस्थ जीवनशैली तुम्हाला व्यायामामुळेच मिळते असेही म्हटले आहे. सलमानने आपले पहिले जिम 18 सप्टेंबरला दिल्लीत उघडले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER