‘राधे’ चित्रपटाच्या सेटवर भावुक झाला सलमान खान

Salman Khan

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खानने (Salman Khan) प्रभु देवा दिग्दर्शित ‘राधेः योर मोस्ट वॉन्टेड भाई’ चित्रपटाच्या शूटिंगला पुन्हा सुरुवात केली आहे. कोरोना (Corona) काळात चित्रपटाचे शूटिंग बंद करण्यात आले होते. चित्रपटाच्या सेटवर सलमान भावनिक झाल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक, या चित्रपटाच्या सेटवर संगीतकार जोडी साजिद-वाजिदचा साजिद हजर होता आणि गाण्याचे शूटिंग सलमानवर होत आहे.

काही महिन्यांपूर्वी वाजिद खानचे निधन झाले. अलीकडे, साजिद, सलमान आणि सोहेल खान गप्पा मारत असताना, साजिदने सलमानला वाजिदच्या वाढदिवसा बद्दल सांगितले, हे ऐकून सलमान भावनिक झाला आणि आकाशकडे पाहून दोघांनिही वाजिदची आठवण केली. राधे चित्रपटाच्या सेटवर केकची व्यवस्था करण्यात आली होती आणि वाजिदचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

याप्रसंगी साजिद म्हणाला की, सलमान, मी आणि सोहेल यांनी चंद्राला पाहिले होते आणि वाजिद आमच्याकडे पहात आहे असे आम्हाला वाटले. सलमानने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि असे सांगितले की, वाजिदने नेहमीच आम्हाला पाठिंबा दिला.

सांगण्यात येते की राधेः योर मोस्ट वॉन्टेड भाई या चित्रपटात सलमान खान सोबत दिशा पाटनी दिसणार आहे. अलीकडेच दिशाने सलमानबरोबर चित्रपटाची शूटिंग सुरू केली आणि ती पूर्णही केली. दिशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती दिली. तिने टीमबरोबर स्वत:चा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘राधे पॅकअप. सर्वोत्कृष्ट असल्याबद्दल माझ्या सुंदर टीमचे आभार. गर्ल पावर. ‘

 

View this post on Instagram

 

#radhe packup❤️ thank you my lovely team for being the best ever❤️❤️ #girlpower💪🏽

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER