एक कोटी देण्यास तयार असतानाही सलमान खानला मिळेना ‘परमवीर’

Salman Khan doesn't get 'Paramveer' even though he is ready to pay Rs 1 crore

सलमान खान (Salman Khan) बॉलिवूडमधील सगळ्यात जास्त कमाई करणारा आणि सतत सुपरहिट सिनेमा देणारा नायक आहे. त्याचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींची कमाई करण्यात नेहमीच यशस्वी होतात त्यामुळे त्याचे सिनेमे वितरक हातोहात विकत घेतात. सलमान सिनेमाच्या कलेक्शनच्या प्रॉफिटमध्ये हिस्सा मागत असल्याने सिनेमा हिट झाल्यानंतर कोट्यावधी रुपये त्याच्या खिशात पडतात. कोट्याधीश असल्याने सलमान खान त्याला जी गोष्ट आवडेल ती लगेचच विकत घेऊ शकतो. त्या वस्तूची किंमत किती आहे हे त्याला पाहावेही लागत नाही. मात्र ‘परमवीर’वर (Param veer) त्याला आवडला असतानाही आणि त्यासाठी तो चक्क एक कोटी रुपये मोजण्यास तयार असतानाही तो त्याला मिळत नाही. आता तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल की, हा कोण परमवीर जो सलमान खानला इतक्या मोठ्या रकमेनंतरही नाही म्हणतोय? थांबा आम्ही तुम्हाला देतो या प्रश्नाचे उत्तर.

सगळ्यात अगोदर तुमची उत्सुकता जास्त न ताणता सांगून टाकतो की, परमवीर हा कुठलाही हिट सिनेमा नाही किंवा नवा कलाकारही नाही. तर परमवीर हा एक अबलख घोडा आहे. आता तुम्ही नक्कीच आश्चर्याने तोंडात बोट घातले असले. एका घोडा सलमानला आवडतो आणि त्यासाठी तो एक कोटी देण्यास तयार असतानाही तो का दिला जात नाही असा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल. तर हा परमवीर नावाचा घोडा अत्यंत उच्च अशा मारवाडी ब्रीडचा आहे. पंजाबच्या फरीदकोट जिल्ह्यात हॉर्स ब्रीडर्सची स्पर्धा सुरु होती. या स्पर्धेत अहमदाबादच्या भैसडा स्टड फार्मचे रंजीत सिंह राठोड त्यांचे दोन घोडे घेऊन आले होते. परमवीर या दोन घोड्यांपैकी एक आहे. काळ्या रंगाचा हा घोडा प्रचंड देखणा आहे. गेल्या वर्षीही हा घोडा या स्पर्धेत आणण्यात आला होता. त्यावेळी रिलायन्स ग्रुप हा घोडा विकत घेऊ इच्छित होता आणि त्यांनी त्यासाठी 1 कोटी रुपयांची बोली लावली होती. पण रंजीत सिंह राठोड यांनी तेव्हा हा घोडा विकला नव्हता आणि आता सलमाननेही एक कोटी देण्याची तयारी दर्शवली असली तरीही ते हा घोडा विकण्यास तयार नाहीत.

सलमान खानची टीम रंजीत सिंह यांच्या संपर्कात असून त्याला पटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र अजून तरी रंजीत सिंह यांनी सलमान खानला होकार दिलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER