सलमान खानने केले काँग्रेस आमदार ऋतुराज पाटलांचे कौतुक

Salman Khan-Rituraj Patil

मुंबई : देशभरासह राज्यातही कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर या संकटकाळी अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. तसेच आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर, नर्स, पोलिस बाहेर पडत आहेत.  यांना युवा आमदार ऋतुराज पाटील यांनी स्वखर्चातून मदत केली आहे.

या संकटसमयी कोरोनाविरोधात आघाडीवर लढणाऱ्या कोल्हापूर शहरात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना युवा आमदार ऋतुराज पाटील यांनी स्वखर्चातून मूलभूत गोष्टींचा पुरवठा करीत मोठी मदत केली आहे. त्यांच्या या सेवाकार्याची दखल थेट बॉलिवूड अभिनेते सलमान खानने घेतली आहे. ट्विटद्वारे त्यांनी आमदार पाटील यांचे कौतुक केले आहे.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील युवा आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूरमधील खाजगी डॉक्टर, आयसोलेशन हॉस्पिटल, कम्युनिटी क्लिनिकमधील डॉक्टर, १०८ रुग्णवाहिका डॉक्टर आणि चालक, व्हाईट आर्मी जवान यांना स्वखर्चाने एक  हजार पीपीई किट्स दिल्या आहेत. याशिवाय इतर प्रकारची मोठी मदतही त्यांनी सर्वसामान्यांना केली आहे.