सलमान कॅटरीना पुन्हा एकत्र, टायगर 3 चे शूटिंग करणार सुरु

Tiger 3

सलमान खानने एक था टायगर (EK Tha Tiger) सिनेमात गुप्तहेर टायगरची भूमिका साकारून प्रेक्षकांपुढे एका नवा भारतीय बाँड सादर केला होता. प्रेक्षकांना सलमानचा टायगर प्रचंड आवडला होता. त्यामुळेच टायगरचा आणखी एक भाग, टायगर जिंदा है प्रेक्षकांपुढे आणण्यात आला होता. या सिनेमाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. त्यानंतर टायगर 3 (Tiger 3)ची चर्चा सुरु झाली होती. मात्र चांगली कथा मिळत नसल्याने टायगर 3 थोडा मागे पडला होता. पण आता टायगर 3 च्या प्री प्रॉडक्शने काम संपले असून पुढील वर्षी मार्च महिन्यात या सिनेमाचे शूटिंग सुरु केले जाऊ शकते. या सिनेमातून पुन्हा एकदा सलमान खान (Salman Khan) आणि कॅटरीनाची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पडद्यावर येणार आहे.

सलमान खान आणि कॅटरीना कैफने आतापर्यंत युवराज, पार्टनर, मैंने प्यार क्यूं किया, एक था टाइगर, टाइगर जिंदा है आणि भारत या आठ सिनेमात एकत्र काम केले आहे. हा त्यांचा नववा सिनेमा आहे. कॅटरीनाने सलमान खानच्या बॉडीगार्ड सिनेमाच्या टायटल साँगमध्येही काम केले होते. पहिल्या दोन्ही टायगर सिनेमांपेक्षा टायगरचा हा तिसरा भाग भव्य असणार आहे. स्पेशल इफेक्ट आणि अॅक्शनने भरलेल्या या सिनेमाचे नाव ‘टायगर 3’ असेच ठेवण्यात येणार असल्याचे समजते. या सिनेमाचे दिग्दर्शन मनीष शर्मा करणार आहे. विशेष म्हणजे ‘एक था टायगर’चे दिग्दर्शन कबीर खानने केले होते तर ‘टायगर जिंदा है’ चे दिग्दर्शन अली अब्बास जफरने केले होेते.

सलमान खान सध्या बिग बॉसच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून कॅटरीना कैफही भूत पोलीसच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हे दोन्ही प्रोजेक्ट हातावेगळे केल्यानंतर सलमान आणि कॅटरीना टायगर 3 च्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. टायगर फ्रेंचायजीमधील या तिसऱ्या सिनेमाचे शूटिंग तीन शेड्यूलमध्ये केले जाणार आहे. पहिले शेड्यूल मार्चमध्ये मुंबईतच पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर संपूर्ण यूनिट मिडल ईस्टला दुसऱ्या शेड्यूलच्या शूटिंगसाठी रवाना होणार आहे. त्यानंतर तिसरे शेड्यूल पुन्हा मुंबईत केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही बातमी पण वाचा : जेव्हा सलमानच्या या अभिनेत्रीने छेड करणाऱ्यांना केली मारहाण, आता चित्रपट सोडून…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER