मुंबईतील ‘कोविड वॉरिअर्स’साठी सलमान पुन्हा धावला; जेवणाची केली व्यवस्था

Salman Khan

मुंबई : देशभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले आहे. गेल्या वर्षी सलमान खान (Salman Khan) याने कोरोनाशी दोन हात करत असताना गरजूंना अन्नधान्याचे किट आणि पैशांची मदत केली होती. आता पुन्हा एकदा सलमान मदतीसाठी पुढे सरसावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सलमान खान फ्रंटलाईन कामगारांसाठी फूड किट्स पाठवत आहे. तो सर्वांना या फूड किटचे वाटप करत आहे. युवा सेनेचे नेते राहुल कनल यांनी याबाबत माहिती दिली आहे. राहुल म्हणाले की, सलमान पोलीस अधिकारी, बीएमसी कर्मचारी आणि आरोग्य कर्मचार्‍यांच्या मदतीसाठी पुन्हा एकदा पुढे आला आहे.

इतकेच नव्हे तर, सलमानने स्वतःच्या हाताने हे फूड किट्स वाटप केले आहेत. याआधी त्याने चक्क स्वतः हे जेवण चव घेऊन पाहिले. अन्नाच्या गुणवत्तेची त्याने विशेष खबरदारी घेतली आहे. या पदार्थांची चव घेत असतानाचा सलमानचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button