औरंगाबाद : नायलॉनच्या मांज्यांची विक्री, तिघांवर गुन्हा

Sale of nylon manja 3 arrested in Aurangabad

औरंगाबाद :- नायलॉन मांज्याच्या विक्रीवर बंदी असतांना देखील त्याची विक्री करणाऱ्या विविध परिसरातील तीन दुकानांवर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छावणी परिसरातील राधेश्याम रमेशसिंग सुर्यवंशी (वय २५) याच्या चाँदमारी परिसरातील दुकानावर छापा मारून ९०० रुपयांचा नायलॉन मांजा पोलिसांनी जप्त केला आहे.

विजय नगरात राहणारा विजय जीवन बडवणे (वय ३२) व शिवनेरी कॉलनीत राहणारा ऋषीकेश रमेश पालोदकर या दोघांच्या दुकानांवर पोलिसांनी छापा मारुन नॉयलॉन मांजा जप्त केला आहे. नायलॉन मांज्याची विक्री करणाऱ्याविरूध्द अनुक्रमे छावणी व पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.