महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत ३००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

Maha Development Loan 2031

मुंबई: महाराष्ट्र शासनाने 11 वर्ष मुदतीचे एकूण रुपये 3000 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले आहेत. विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहील , तसेच राज्य शासनाच्या एलएनएफ 10.19/प्र.क्र.10/अर्थोपाय, दिनांक 16 मे, 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या व वेळोवेळी सुधारित केलेल्या शती व अटींचे अधीन राहील.

याकर्जाव्दारे मिळालेल्या रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चासाठी अर्थ पुरवठा करण्यासाठी करण्यात येईल. भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद 293 (3) अन्वये सदरील कर्ज उभारणीस केंद्र शासनाची अनुमती घेण्यात आली आहे . शासकीय रोख्यांची विक्री भारतीय रिझर्व बँक , फोर्ट , मुंबई ४०० ००१ व्दारे दि. १६ मे , २०१ ९ च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचना क्र . एलएनएफ . १०.१ ९ / प्र .क्र .. १० / अर्थोपाय , परिच्छेद ६.१ निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येईल.

अस्पर्धात्मक बिटर्सला प्रदान, राज्य शासनाच्या सर्वसाधारण अधिसूचना क्रमांक एलएनएफ. १०.१ ९ / प्र.क्र .१० / अयोपाय , दिनांक १६ , मे , २०१ ९ मधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल . मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल .

लिलावाचा दिनांक व ठिकाण – भारतीय रिझर्व बँकेत दिनांक ०२ जून , २०२० रोजी त्यांच्या फोर्ट , मुंबई येथील कार्यालयात लिलाव आयोजित करण्यात येईल . लिलावाचे बिडस् दिनांक ०२ जून , २०२० रोजी खालीलप्रमाणे संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व बैंक ऑफ इंडिया , कोअर बँकींग सोल्यूशन ( ई – कुबेर ) सिस्टीमनुसार सादर करण्यात यावेत : (अ) स्पर्धात्मक विडस् संगणकीय प्रणालीद्वारे , रिझर्व बैंक ऑफ इंडिया , कोअर बँकींग सोल्यूशन ( ई – कुबेर ) सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते दुपारी ११.३० वाजेपर्यंत सादर करण्यात यावेत .

अस्पर्धात्मक विडस् संगणकीय प्रणालीद्वारे , रिझर्व बैंक ऑफ इंडिया , कोअर बँकींग सोल्यूशन ( ई – कुबेर ) सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० वाजेपर्यंत सादर करण्यात यावेत .

लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व बैंक , मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल , यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक ०३ जून , २०२० रोजी करण्यात येईल.

अधिदानाची कार्यपद्धती – यशस्वी झालेल्या बिडर्सकडून दिनांक ०३ जून , २०२० रोजी रिझर्व बैंक ऑफ इंडिया , फोर्ट , मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने , बैंकर्स धनादेश / प्रदान आदेश , डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व बैंक ऑफ इंडिया , मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बैंकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येईल .

कर्जरोख्याचा कालावधी – कर्जरोख्याचा कालावधी ११ वर्षांचा असेल . रोख्याचा कालावधी हा दिनांक ०३ जून , २०२० रोजी पासून सुरू होईल.

परतफेडीचा दिनांक – दिनांक ०३ जून , २०३१ रोजी पूर्ण किमतीने कर्जाची परतफेड करण्यात येईल .

व्याजाचा दर .— अधिकतम प्राप्तीचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कुपन दराएवढा असेल , व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दिनांक डिसेंबर, ०३ आणि जून, ०३ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल .

कर्जरोख्याची पात्रता.- शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकीग विनियम अधिनियम , १ ९ ४ ९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर ( SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल.

सदर कर्ज रोखे हे पुनः विक्री खरेदीसाठी अनुज्ञेय असतील .

Source:- Mahasamvad News


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER