सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन खासगी बँकांत होणार; राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई : खासगी बँकांना मर्यादित प्रमाणात शासकीय बँकिंग व्यवहार हाताळण्यास बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (state cabinet) मान्यता देण्यात आली. यापूर्वी शासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम आणि महामंडळांकडील बँकिंग व्यवहार केवळ राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत करण्याचे ठरले असले तरी शासनाची मान्यता असलेल्या खासगी बँकांमध्येही वेतन आणि भत्ते  जमा करता येणार आहेत.

राज्य सरकारकडून आता मर्यादित प्रमाणात खासगी बँकांनादेखील शासकीय बँकिंग व्यवहार हाताळण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये सरकारी विभागांना खासगी बँकांच्या मदतीने संगणकीय तंत्रज्ञान आधारित प्रणाली आणि सेवा विनाशुल्क वापरता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER