साजिदने जिया खानला टॉप आणि ब्रा काढण्यास सांगितले होते, जियाच्या बहिणीने केला खुलासा

Sajid-Jia

बॉलिवुडमध्ये जिया खानने (Jiah Khan) अल्पावधीतच चांगले यश प्राप्त केले होते. करिअरची सुरुवातच राम गोपाल वर्माच्या (Ram Gopal Verma) सिनेमातून ‘निशब्द’मधून केली होती. यात तिला अमिताभसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र नंतर तिने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. जियाच्या आईने यासाठी आदित्य पंचोलीचा मुलगा सूरज पंचोलीला दोषी ठरवले होते. हे प्रकरण अजूनही न्यायालयात आहे. आता जियाच्या बहिणीने दिग्दर्शक साजिद खानने जियाला टॉप आणि ब्रा काढण्यास सांगितले होते असे सांगत खळबळ माजवली आहे.

दिवंगत अभिनेत्री जिया खानच्या जीवनावर बीबीसी 2 ने ‘डेथ इन बॉलिवूड’ नावाची एक मालिका तयार केली आहे. ही मालिका नुकतीच यूकेमध्ये प्रसारित करण्यात आली. या मालिकेच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये जियाच्या बहिणीने करिश्माने दिग्दर्शक साजिद खानवर जियाच्या सेक्सुअर हॅरेसमेंटचा आरोप लावला आहे. करिश्माने सांगितले, “साजिदच्या एका सिनेमात जिया काम करीत होती. सिनेमाची रिहर्सल सुरु होती. जिया स्क्रिप्ट वाचत होती तेव्हा साजिद खानने तिला टॉप आणि ब्रा काढण्यास सांगितले. हे ऐकल्यावर काय करावे तेच जियाला कळले नाही. तिने म्हटले अजून सिनेमा सुरु झाला नाही तोच हे सगळे होऊ लागले आहे. ती तेथून रडतच घरी आली. खरे तर तिला सिनेमा करायचा नव्हता. पण सिनेमा सोडला असता तर तिच्यावर केस दाखल झाली असती आणि तिची बदनामी झाली असती म्हणून तिला ‘हाउसफुल’ हा सिनेमा करावा लागला असेही करिश्माने म्हटले आहे.

एवढेच नव्हे तर साजिदने तिचा म्हणजे करिश्माचाही फायदा उचलण्याचा प्रयत्न केला असेही करिश्माने सांगितले. या घटनेबाबत करिश्मा म्हणते, “मी तेव्हा 16 वर्षांची होते आणि जियासोबत साजिद खानच्या घरी गेले होते. मी स्ट्रॅपी टॉप घातला होता आणि किचनमध्ये टेबलवर बसले होते. तेव्हा साजिदने माझ्याकडे पाहात म्हटले, ‘तिला सेक्स पाहिजे.’ हे वाक्य ऐकताच जियाने लगेचच साजिदला, हे तू काय बोलतोयस असे विचारले तेव्हा साजिद म्हणाला, बघ ती कशी बसलीय. त्यावर जियाने, ती अजून लहान आहे, निष्पाप आहे. तू काय बोलतोस ते तिला समजत नाही. असे बोलून आम्ही दोघी घरी आलो असेही करिश्माने या व्हिडियोत सांगितले आहे.

2018 मध्ये साजिद खानवर ‘मी टू’चे अनेक आरोप करण्यात आले होते. यात सलोनी चोप्रा, रशेल व्हाइट, अहाना कुमरा, मंदाना करीमी, मॉडल पॉला आणि एका महिला पत्रकाराचाही समावेश आहे. या आरोपानंतर साजिदची ‘हाउसफुल 4’ मधून हकालपट्टी करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER