सईच्या लग्नाचा बार नोव्हेंबरमध्ये

बिगबॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) गेल्यावर्षीच्या सिझनमध्ये एक नाव चर्चेत होतं आणि ते म्हणजे सई लोकूरचे (Sai Lokur). बिगबॉसमध्ये विजेतेपर्यंत जरी सईची झेप गेली नसली तरी एक समंजस मुलगी म्हणून सईने प्रेक्षकांची पावती मिळवली होतीच. आता हीच पावती तिला तिच्या भावी नवऱ्याकडूनही मिळाली आहे. मॅट्रीमोनी साइटवरून (Matrimony site) सई लोकूरने तिच्या जोडीदाराची निवड केली असून तीर्थदीप राय असे त्याचे नाव आहे. साहजिकच मराठमोळी सई आता हिंदीभाषिक घरची सून होणार आहे. सईचा साधेपणा आणि समजूतदार पणा आवडल्यानेच तिच्यासोबत लग्न(Wedding) करण्याचे ठरवले असल्याचे तीर्थदीपने सांगितल्यामुळे सई खुश आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सई आणि तीर्थदीप ऑनलाइन भेटले, नंतर सईला भेटण्यासाठी तो बेळगावला तिच्या घरी आला आणि त्याच दिवशी दोघांच्याही मनातील तार वाजली. भेटल्यापासून तीन महिन्यात त्यांचे दोनाचे चार हात होणार असून ३० नोव्हेंबरचा मुहूर्तही निघाला आहे.

गेल्या आठवड्यात सईच्या सोशल मीडिया पेजवर पाठमोऱ्या कपल्सचा एक फोटो तिने शेअर केला होता. त्याखाली कॅप्शन होती की, मला माझा जोडीदार मिळाला. सईला नेहमीच कोणतीही गोष्ट सरप्राईज ठेवायला खूप आवडते. त्यामुळेच तिने तिच्या आयुष्यातील हा गुलाबी क्षण तिच्या चाहत्यांना रोमँटीक स्टाइलने सांगायचे ठरवले. सईने तिला जोडीदार मिळाल्याची पोस्ट तर केली पण तो कसा आहे याची उत्सुकता तिने पुढचे दोन दिवस ताणवत ठेवली. पुढचा फोटोही तिने पोस्ट केला तेव्हाही फोटोत तिच्या भावी नवऱ्याचा चेहरा दिसणार नाही याची काळजी घेतली. मात्र पुढच्या दोन दिवसात सईच्या हातावर मेंदी काढण्याचा कार्यक्रम सुरू असल्याच्या व्हिडिओने तिच्या इन्स्टावरच्या पोस्टने लक्ष वेधले. मग मात्र सईच्या साखरपुड्याच्या फोटोंनीच सगळं काही सांगून टाकलं. पिवळ्या रंगाचा घागरा आणि मरून ओढणीत सई खुलून दिसली तर आमच्या सगळ्या आवडीनिवडी खूपशा सारख्या आहेत असं म्हणणारा तिचा होणारा नवराही पिवळ्या रंगाच्याच शेरवानीत सईला शोभून दिसत होता.

बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री सई लोकूरचा पार पडला साखरपुडा | eSakalसई लोकून आणि तीर्थदीप रॉय ही नावं ऐकली तर मराठी हिंदीची जोडी कशी जमली हा प्रश्न तिच्या चाहत्यांना काही स्वस्थ बसू देत नव्हता. त्यासाठी सई आणि तीर्थदीप यांनी एकत्रित व्हिडिओ करत आमचं अस्सं जुळलंची स्टोरी सांगितली. सई म्हणाली, गेल्या दीड वर्षापासून ती लग्नासाठी मुलगा शोधत होती पण एका भेटीत क्लिक होईल असं कुणी मिळत नव्हत. जीवनसाथी वेबसाइटवर मी नाव नोंदवले तेव्हा खरंतर माझ्या कामासाठी मुंबईतच राहण्याची अट असल्याने मी फक्त मुंबईच्याच मुलांचे प्रोफाईल बघत होते. पण एकदा बहिणीशी बोलत असताना तिनेच मला सांगितलं की मुंबईचाच नवरा हवा हा हट्ट सोडून जरा नवरा शोध. का कुणास ठाऊक, मी बहिणीचे ऐकले आणि प्रोफाइलमधून ती अट काढून टाकली. सई मुंबईवरच अडून बसली असताना तिकडे तीर्थदीपने कंटाळून प्रोफाइलचा हाइड करून ठेवले होते. ज्यादिवशी सईने तिच्या प्रोफाइलमधून मुंबईत राहणारा मुलगा ही अट काढून टाकली त्याच दिवशी बघूया तरी सहज म्हणून तीर्थदीपने त्याचे प्रोफाइल उघडले होते. हाच तो क्षण जेव्हा सई आणि तीर्थदीप यांची ऑनलाइन भेट झाली. चॅटिंग सुरू झाले आणि मग थेट मुद्दा भेटीवर आला. पहिल्या भेटीतच सगळं काही जुळलं आणि हिंदी मराठी भाषिक असल्याची रेष पुसली गेली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सईच्या करिअरसाठी मुंबई महत्त्वाची असल्याने तीर्थदीपनेही मुंबईतच राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे सई सध्या सातवे आसमानपर आहे.

मूळची बेळगावची असलेल्या सईने तिची आई वीणा लोकूर यांनी दिग्दर्शित केलेल्या मिशन चँपियन या सिनेमातून अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली. त्यानंतर किस किस को प्यार करू या हिंदी सिनेमात कपिल शर्माच्या पत्नीच्या भूमिकेतही सई भाव खाऊन गेली. बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोमुळे सईच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली. डान्सची आवड असलेल्या सईचे अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल आहेत. आता कुठे साखरपुड्याची अंगठी घातली आहे. साखरपुड्याची बातमी तर सईने ऑनलाइनवर खास स्टाइलने दिली. आता तिच्या बेळगावच्या घरी लग्नाची धामधूम सुरू झाल्याचे ती तिच्या एकसे एक फोटोमधून कळवेलच, तोपर्यंत तिच्या चाहत्यांनी धीर धरावा इतकेच.

ही बातमी पण वाचा : जोतिबासाठी विशाल एका आठवड्यात शिकला घोडेस्वारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER