बॅचलर पार्टीत सईची धमाल

sai Lokur

एकदा का संसारामध्ये अडकलं की मग नंतर कितीही म्हटलं तरी मैत्रिणींबरोबर गप्पा मारणे त्यांच्याबरोबर पार्टी करणे या सगळ्यांपासून मुली थोड्या का होईना पण लांब जातात. मग हीच कसर भरून काढण्यासाठी बॅचलर पार्टी हा ट्रेंड सध्या जोरात सुरू आहे. अभिनेत्री सई लोकूरच्या (Actress Sai Lokur) मैत्रिणी देखील ही संधी कशी सोडतील? सई लोकूरच्या मैत्रिणींनी एक दणदणित अशी पार्टी दिली. या सगळ्या मैत्रिणीनी बेळगावमध्ये प्रचंड धमाल करत नव्या सईला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बिग बॉस मराठी या शोमुळे घराघरात पोहोचलेली आणि मराठी व हिंदी सिनेमा, मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी सई 30 नोव्हेंबरला तीर्थदीप रॉय याच्याशी लग्न करत आहे. गेल्याच महिन्यामध्ये सई आणि तीर्थदीपचा साखरपुडा झाला. नेहमीच सई तिच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या आनंददायी गोष्टी तिच्या चाहत्यांना सांगण्यासाठी उत्सुक असते. तीर्थदीपसोबत नात्यात बांधली जाणारी आयुष्यातली आनंदाची गोष्ट सगळ्यात हटके पद्धतीने तिच्या चाहत्यांना पर्यंत पोचवली होती. साखरपुडा होण्यापूर्वीच सईच्या सोशल मीडिया पेज वर सई आणि तीर्थदीपचे पाठमोरे फोटो अपलोड केले होते. मला माझ्या आयुष्याचा जोडीदार मिळाला अशी गोड कॅप्शन देखील तिने त्या फोटोला दिली होती. यावरून तिच्या चाहत्यांनी काय ओळखायचे ते ओळखलं होतं. लवकरच लग्नाची तारीख देखील जाहीर करते असे देखील तिने सांगितलं होतं. आता 30 नोव्हेंबर लग्नाची तारीख ठरली आहे त्यामुळे दिवाळीची धामधूम झाली आणि तुळशीचं लग्न लागलं की सई देखील बोहल्यावर चढणार आहे. गेल्या महिन्याभरापासून सई आणि तीर्थदीप यांची लग्नाची खरेदी देखील सुरू आहे.

काही दिवसापूर्वीच मुंबईहून फक्त सईला भेटण्यासाठी तिचा होणारा नवरा तीर्थदीप बेळगावला आला होता. त्याचे देखील फोटो तिच्या चाहत्यांना सोशल मीडिया पेजच्या माध्यमातून पहायला मिळाले. एकूणच सई तिच्या या नव्या नात्याबद्दल आणि नव्या आयुष्याबद्दल प्रचंड खुश आहे. बॅचलर पार्टी हा सध्या तरुणाईमध्ये फूल टू धमाल असलेला सोहळा आहे. बेळगाव मधल्या सईच्या कॉलेजमधल्या मैत्रिणीनी बॅचलर पार्टी द्यायची ठरवली. यासाठी एका रिसॉर्टवर या सहाजणी पोहोचल्या. त्या ठिकाणी वेगवेगळे ड्रेस मधले फोटो या मैत्रिणींनी मिळून शूट केले. यामध्ये तिच्या मैत्रिणी वेगळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तर सई खास व्यक्ती असल्यामुळे तिला वेगळ्या रंगाचा ड्रेस आणला होता. मी लवकरच लग्न करत आहे असं लिहिलेल्या रेड टी शर्टमध्ये सई लक्ष वेधून घेत होती. या सगळ्या ड्रेस मध्ये सई कमालीची सुंदर दिसत होती. या पार्टीमध्ये सई आणि तिच्या मैत्रिणीनी प्रचंड धमाल केली. त्याचे खूप सारे फोटो त्यांनी काढले आहेत.

सई सांगते की खरच मैत्रिणी हा आयुष्यातला खूप महत्त्वाचा भाग असतो. माझं बालपण, शिक्षण हे सगळे बेळगाव मध्ये गेले आहे. इथे माझा मित्र परिवार खूप मोठा आहे. त्यातही माझ्या मैत्रिणी आणि आम्ही खूप वर्षापासून आणि एकमेकांशी जोडल्या गेल्या आहोत. खरे तर शिक्षणाच्या निमित्ताने नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने प्रत्येक जण आपापल्या व्यापात असते पण आम्हाला एकमेकीला जेव्हा गरज असते तेव्हा आम्ही सगळ्या सोबत असतो. मैत्री ही कायमस्वरूपी जपण्याचे एक नात आहे. माझं लग्न ठरल्याचे माझ्या मैत्रिणींना कळलं तेव्हा त्यांना देखील खूप आनंद झाला. आणि जसा मी मुलगा शोधत होते तसाच तीर्थदीप असल्याने माझ्या मैत्रिणी माझ्यापेक्षा देखील खुश होत्या . सईचे लग्न ठरल्याच्या आनंदासाठी बेळगाव मध्ये झालेल्या या बॅचलर पार्टीत सई आणि तिच्या मैत्रिणीनी त्यांच्या खूप साऱ्या आठवणींना देखील उजाळा दिला आहे.

मूळची बेळगावची असलेल्या सईने तिची आई वीणा लोकूर यांनी दिग्दर्शित केलेल्या मिशन चँपियन या सिनेमातून अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली. त्यानंतर किस किस को प्यार करू या हिंदी सिनेमात कपिल शर्माच्या पत्नीच्या भूमिकेतही सई भाव खाऊन गेली. बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोमुळे सईच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली. डान्सची आवड असलेल्या सईचे अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल आहेत.

ही बातमी पण वाचा : प्रियाचे मिशन आकाशकंदिल फत्ते

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER