तिहेरी तलाक विरोधात लढा देणारी सायरा बानोचा भाजप प्रवेश

Saira Bano Join BJP

मुंबई :  तिहेरी तलाकविरोधात ( Triple Talaq) लढाई लढणारी महिला सायरा बानो (Saira Bano) हिने भाजपात (BJP) प्रवेश केला आहे. उत्तराखंड भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बंशीधर भगत यांच्या उपस्थितीत सायरा बोनो हीने भाजपात प्रवेश केला. सायरा बानो उत्तराखंडच्या उधमसिंह नगर जिल्ह्यात राहते.

तिहेरी तलाक विरोधात न्यायालयाचे दार ठोठावणारी सायरा बानो ही पहिली मुस्लिम महिला आहे 23 फेब्रुवारी 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयात त्यांनी ट्रिपल तलाकविरोधात याचिका दाखल केली होती. या कायदेशीर लढाईत न्यायालयाने तिहेरी तलाकवर ऐतिहासिक निर्णय दिला होता.

न्यायालयातील याचिकेत तिहेरी तलाकसह निकाह हलालावरही तिने आव्हान दिले होते. तसेच समाजातील एकापेक्षा जास्त विवाहच्या प्रथेवरही आवाज उठवत ही प्रथा संपविण्याची मागणी केली होती.

भाजपात प्रवेश केल्यानंतर सायरा बानो हिने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या विचार, नितीमुळे त्या प्रेरित झाल्या आहेत. यापुढेही महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याचेही सायरा बानो यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : खडसेंच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे नेते उताविळ; जळगाव जिल्हा राष्ट्रवादीत बदलाचे वारे!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER