सैफही मानसिकदृष्ट्या खचला होता

Saif Ali Khan

बॉलिवुडमध्ये (Bollywood) फक्त नव्या कलाकारांसोबतच नव्हे तर स्टार कि़ड्ससोबतही वाईट घटना घडलेल्या आहेत. यात सध्या हिट असलेल्या सैफ अली खानचाही (Saif Ali Khan) समावेश आहे. आज सैफने एक चांगला अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याने ओटीटीवर येऊन हिट वेबसीरीज दिल्या आहेत. आता पुन्हा एकदा तो ‘तांडव’ या वेबसीरीजमधून प्रेक्षकांसमोर येत आहे. पण हे यश सहजासहजी मिळाले नाही असे सैफने बोलताना म्हटले.

सैफने करिअरबाबत बोलताना सांगितले, मी सिनेमात आलो. काही सिनेमे केले. पण सगळेच काही यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे मी जेव्हा काम मागण्यासाठी जात असे तेव्हा निर्माते मला भेटही देत नसत. त्यामुळे मी खूप निराश झालो होतो. काही काळ तर माझ्याकडे एकही सिनेमा नव्हता. त्यामुऴे मी मानसिकदृष्ट्या खचलो होतो आणि अभिनय सोडण्याचाही विचार मनात येत होता. पण मी मनाशी ठरवले की आपल्याला यश मिळवायचेच आहे. त्यादृष्टीने मी मेहनत सुरु केली आणि यश मिळवले. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मला काम दिले त्या सगळ्यांचा मी आभारी आहे. त्यांच्यामुळेच मी आज माझी ओटीटीवरील इनिंग सुरु करू शकलो आहे असेही सैफने यावेळी सांगितले.

सध्या सैफकडे अनेक मोठे सिनेमे आहेत. यात प्रभाससोबतच्या ‘आदिपुरुष’चाही समावेश आहे. यात सैफ रावणाची भूमिका साकारणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER