छोटे नवाब तैमूरची मुख्यमंत्री साहाय्यता निधीला मोठी मदत; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

saif kareena-taimur-ali-khan-donate-money-pm-and-cm-relief-fund

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिग्गज मंडळींनी केंद्र आणि राज्य सरकारला मोठी आर्थिक मदत केली आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री करिना कपूर-खान, सारा अली खान आणि तैमूर अली खान यांनीही कोरोना विरोधात लढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला आर्थिक मदत केली आहे.

विशेष म्हणजे या सर्वांनी मदत दिलेल्या रकमेचा आकडा उघड केला नाही. करिना कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून सरकारला मदत दिल्याची माहिती दिली आहे. करिना कपूर, सैफ आणि सारासोबत तैमूरनेही आर्थिक मदत केल्याने सर्वच स्तरांतून त्याचे कौतुक केले जात आहे.

मुख्यमंत्र्यांनीही ट्विट करत या चौघांचे आभार व्यक्त केले आहे. “मी, सैफ अली खान आणि तैमूर अली खान आम्ही सर्वांनी केंद्र आणि राज्य सरकारला आर्थिक मदत केली आहे. तुम्ही सर्वांनीही सरकारला आर्थिक मदत करा. ” असे आवाहन करिना कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून चाहत्यांना केले आहे. कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे करिना, सैफ आणि तैमूर घरात वेळ घालवत आहेत. त्यासोबत त्यांनी इतरांनाही घरी राहण्याचे आवाहन केले आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छोटे नवाब तैमूरसह खान परिवाराचे आभार मानले आहे.

लॉकडाऊन काळात 10 हजार लोकांच्या जेवणाची जबाबदारी उचलली