‘समलैंगिक’ म्हटल्याने सैफने घरी जाऊन मारले होते

Saif Ali Khan

सैफ अली खानला (Saif Ali Khan) लगेच राग येतो. त्याला स्वतःलाही त्याची ही उणीव ठाऊक आहे. यावर त्याने मात करण्याचा वेळोवेळी प्रयत्नही केला आहे. आता त्याला जरी कमी राग येत असला तरी काही वर्षांपूर्वी त्याचे रागावर नियंत्रण राहात नसे. 1994 मध्ये सैफ अली खान अक्षयकुमार (Akshay Kumar) सोबत मैं खिलाडी तू अनाडी चित्रपट करीत होता. चित्रपट पूर्ण झाला आणि प्रदर्शित होऊन हिटही झाला. सैफचा हा पहिला हिट चित्रपट होता. अक्षयकुमारबरोबर त्याची जोडी खूपच चांगली जमली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंर समलैंगिकतेचा पुढाकार घेणारे कार्यकर्ते अशोक रावकवी यांनी चित्रपटाबाबत लिहिताना सैफ आणि अक्षयच्या ब्रोमांसबाबत लिहिताना त्याचा संबंध समलैंगिकतेशी जोडला आणि त्यावरच सविस्तर लिहिले. सैफ अलीला यात त्यांनी समलैंगिक असल्याचेही म्हटले. सैफने जेव्हा हे वाचले तेव्हा त्याला खूप राग आला आणि तो सरळ अशोक रावकवी यांच्या घरी गेला आणि त्यांना मारहाण केली. एवढेच नव्हे तर अशोक रावकवी यांची आई भांडण सोडवण्यास आली असता त्यांनाही सैफने ढकलून दिले होते. अशोक रावकवी यांनी पोलिसांमध्ये मारहाणीची तक्रार केली. प्रकरण न्यायालयात गेले. सैफने न्यायालयात अशोक रावकवी यांची माफी मागितली आणि प्रकरण संपुष्टात आले.

काही वर्षांपूर्वी एका हॉटेलमध्येही सैफने मारामारी केल्याचे प्रकरण घडले होते.

म्हणून रजिया सुलतानमध्ये धर्मेंद्रचा चेहरा काळा दाखवला

बॉलिवूडमध्ये निर्माते, दिग्दर्शक, कलाकार एखाद्या चुकीची वा अपमानाची परतफेड करण्याची वाट बघतच असतात. अशी संधी मिळाली की लगेचच ते आपला इंगा दाखवतात. अशाच गोष्टीमुळे रझिया सुलतान चित्रपटात धर्मेंद्रला (Dharmendra) शिक्षा म्हणून काळ्या हबशी गुलामाची भूमिका कमाल अमरोही यांनी दिल्याचे सांगितले जाते.

प्रख्यात अभिनेत्री मीना कुमारी आणि कमाल अमरोही पती पत्नी होते. मात्र धर्मेंद्र आणि मीना कुमारीच्या अफेयरच्या अनेक गोष्टी बॉलिवूडमध्ये चर्चिल्या जात होत्या. कमाल अमरोही यांनी रझिया सुलतान चित्रपट बनवायला घेतला. हेमा मालिनीला त्यांनी रझिया बनवले आणि केवळ धर्मेंद्रवर राग होता म्हणून त्याच्या तोंडाला काळा रंग लावून त्याला हबशी गुलामाची भूमिका दिली होती. एवढेच नव्हे तर त्यापूर्वी पाकिजा चित्रपटातही खरे तर धर्मेंद्र आणि मीना कुमारीची जोडी बनवण्यात आली होती. त्यावेळीही मीना कुमार धर्मेंद्रच्या अफेयरची चर्चा होती. त्यामुळे एका कार्यक्रमात निर्माते, दिग्दर्शक महबूब खान यांनी मुद्दाम महाराष्ट्राच्या राज्यपालांना कमाल अमरोही यांची ओळख करून देताना हे मीना कुमारीचे पति अशी ओळख करून दिली. त्यामुळे कमाल अमरोही प्रचंड नाराज झाले आणि त्यांनी आपला राग धर्मेंद्रवर काढला. त्याला पाकिजा चित्रपटातून काढले आणि त्याच्या जागी राजकुमारला घेतले आणि चित्रपट पूर्ण केला होता. तरीही त्यांचा धर्मेंद्रवरचा राग कमी झाला नव्हता.

जेव्हा देव आनंद आणि प्राणचे शर्ट बदलल्याने झाला गोंधऴ

सदाबहार अभिनेता देव आनंद आणि प्राण यांनी 1948 मध्ये आलेल्या जिद्दी चित्रपटात प्रथमच एकत्र काम केले होते. ते दोघेही तोपर्यंत एकमेकांना ओळखत नव्हते. इस्मत चुगताई यांच्या कथेवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शक होते शाहीद लतीफ. शूटिंगला सुरुवात झाली तेव्हा देव आनंद आणि प्राण यांचे कपडे सेटवर आणण्यात आले. मात्र दोघांनाही त्यांचे कपडे ओळखता यावे यासाठी एका शर्टाच्या पाठीमागे देव आनंदचे आणि एका शर्टाच्या पाठीमागे प्राण यांचे नाव लिहिले होते. मात्र या दोघांना कपडे देताना देव आनंदचे कपडे प्राण यांना आणि प्राण यांचे कपडे देव आनंद यांना देण्यात आले. दोघांनीही लक्ष दिले नाही आणि कपडे घालून सेटवर आले. देव आनंद कोणाशी तर बोलत असतान त्यांचे लक्ष प्राण यांच्याकडे गेले. ते पाठमोरे होते आणि त्यांच्या शर्टवर देव आनंद लिहिलेले त्यांना दिसले. त्यांना आश्चर्य वाटले हा दुसरा देव आनंद कोण आला? त्या व्यक्तीला पाहाण्यासाठी ते पुढे सरकले तेवढ्यात प्राण सामोरे आले. त्यांना पाहताच देव आनंद चकित झाले. देव आनंद यांनी प्राणला शर्टची गोष्ट सांगितली. प्राण यांनीही मग देव आनंदच्या शर्टच्या पाठीवर काय लिहिले ते पाहिले असता त्यावर प्राण लिहिलेले दिसले. त्यानंतर दोघेही खूप हसले. तेव्हाच त्यांची मैत्री झाली आणि ती पुढे कायम टिकली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER