सैफ अली मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरु करणार आदिपुरुषचे शूटिंग

Saif Ali will start shooting for Adipurush

ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित रामायणावर आधारित ‘आदिपुरुष’ सिनेमात सैफ अली खान (Saif Ali Khan) रावणाची भूमिका साकारणार असल्याचे आम्ही तुम्हाला सांगितले होतेच. या सिनेमाचे मुंबईत गेल्या महिन्यात शूटिंग सुरु झाल्याची माहितीही आम्ही तुम्हाला दिली होती. सिनेमाचा नायक साऊथचा सुपरस्टार प्रभास (Prabhaas) सिनेमाच्या शूटिंगसाठी मुंबईत आला असल्याची माहितीही आम्ही तुम्हाला दिली होती. सिनेमाचे एक मोठे शेड्यूल तयार करण्यात आले असून सैफ अली खानही शूटिंगमध्ये भाग घेणार आहे. मात्र सैफ सध्या त्याच्या घरी आलेल्या नव्या बाळाच्या देखरेखीत मग्न असल्याने तो मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सिनेमाचे शूटिंग सुरु करणार असल्याचे सांगितले जात आहे.

सैफ अली खान चौथ्यांदा बाप झाला आहे तर करीनाने दुसऱ्यांदा आई होत मुलाला जन्म दिला आहे. मुलाचा जन्म होण्यापूर्वीच सैफने पेटर्निटी लिव्ह घेतली होती. तो सतत करीनासोबत राहात होता आणि आता मुलगा झाल्यानंतर मुलाच्या देखरेखीत व्यस्त आहे. मात्र १५ मार्चनंतर त्याने पुन्हा कामावर परतण्याचा निर्णय घेतला आहे. सैफ आदिपुरुषच्या सेटवर उपस्थित राहाणार असून सुरुवातीला तो स्वतःचे सोलो सीन चित्रित करणार असून त्यानंतर दुसऱ्या शूटिंग शेड्यूलमध्ये तो प्रभाससोबत शूटिंगमध्ये भाग घेणार आहे. लक्ष्मणाच्या भूमिकेसाठी विकी कौशलला साईन केले असले तरी आदिपुरुषमध्ये सीतेची भूमिका कोण करणार याबाबत अजून निर्मात्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. विकी कौशलही लवकरच शूटिंगमध्ये भाग घेणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER