नेटफ्लिक्सच्या चित्रपटात सैफ अली करणार काम

Saif Ali Khan

ओटीटी प्लॅटफॉर्मची (OTT Platform) ताकद लक्षात घेऊन सर्वप्रथम सैफ अली खानने (Saif Ali Khan)वेब सिरीज मध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. त्याने डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवताना नेटफ्लिक्सच्या सेक्रेड गेम्स  (Sacred Games) मध्ये भूमिका साकारली होती. त्याची ही वेबसिरीज प्रचंड गाजली होती. त्यानंतर अभिषेक बच्चन, तब्बू इत्यादी कलाकारांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर येत वेब सिरीज मध्ये काम केले होते. अभिषेक बच्चनने तर काही चित्रपटांमध्येही काम केले, जे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले. अमिताभ बच्चन (Amithabh Bachchan) यांनीही गुलाबो सिताबो या चित्रपटाद्वारे डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रवेश केला होता. आता सैफ अली खानही ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी बनवण्यात येणाऱ्या चित्रपटात काम करणार आहे.

सैफ अली नेटफ्लिक्स सोबतच एक चित्रपट करणार असल्याची माहिती ती समोर आली आहे.

याबाबत सैफला विचारले असता, त्याने सांगितले, हो नेटफ्लिक्स कडून मला एका चित्रपटाची ऑफर आली आहे. मी स्क्रिप्ट ऐकली असून मला ती खूपच आवडली आहे. चित्रपटाची आयडिया खूपच वेगळी असून दिग्दर्शकही ही चांगला आहे. त्यामुळे मी या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटासाठी डेट्स देण्याबाबत चर्चा सुरू आहे. माझे काही प्रोजेक्ट हातात असल्याने ते पूर्ण झाल्यानंतर या चित्रपटाला सुरुवात केली जाऊ शकते असेही सैफने सांगितले.

सैफ सध्या भूत पोलीस या चित्रपटाचे धर्मशाला मध्ये शूटिंग करत आहे. त्याचबरोबर ओम राऊत दिग्दर्शित प्रभास नायक असलेल्या चित्रपटात सैफ अली खलनायकाची भूमिका साकारत आहे. आदिपुरूष असे नाव असलेल्या या चित्रपटात सैफ रावणाची भूमिका साकारीत असून या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी सुरू केले जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER