हिट चित्रपट सोडले नसते तर शाहरुखला टक्कर देत असता सैफ अली खान; कधी कधी केली चूक

सैफ अली खान (Saif Ali Khan) सध्या चित्रपटसृष्टीत उत्तम चित्रपट करत असेल; पण त्याच्या कारकिर्दीत अनेक चढउतार आले आहेत. बऱ्याच वर्षांपर्यंत त्याला हिट चित्रपट मिळाले नाहीत. यामुळेच तो सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) यासारख्या खान स्टार्सपेक्षा मागे राहिला. मात्र, यामागील एक कारण म्हणजे चित्रपटाच्या निवडीसंदर्भात सैफ अली खानचे  सिलेक्शन. बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांपैकी अनेक चित्रपटांत काम करण्यास त्याने नकार दिला. त्याचबरोबर या चित्रपटांच्या माध्यमातून शाहरुख खान आणि सलमान खान यासारख्या कलाकारांनी आपली छाप पाडली.

‘दिल चाहता हैं’, ‘सलाम नमस्ते’ आणि ‘हम तुम’ यासारखे हिट चित्रपट देणाऱ्या सैफ अली खानने ‘दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे’ या आयकॉनिक चित्रपटातील अभिनयाची ऑफर नाकारली होती. त्याच वेळी या चित्रपटात अभिनय करून शाहरुख खान स्टारडमच्या नव्या उंचीवर पोहचला. असं म्हणतात की, या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी हॉलिवूडचा सुपरस्टार टॉम क्रूझला पहिल्यांदा ऑफर करण्यात आलं होतं.

सैफची चूक आणि शाहरुखला मिळाले स्टारडम

‘दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाची इंडो-अमेरिकन अफेअरची कथा होती; पण त्यानंतर यश चोप्रा यांनी  चित्रपटाची थीम बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी यासाठी सैफ अली खानला ऑफर केले. सैफच्या नकारानंतर त्यांनी शाहरुखची निवड केली. मग हा चित्रपटही सुपरहिट झाला आणि शाहरुख खानची लोकप्रियता सातव्या आसमानात पोहचली. डीडीएलजे बॉलिवूडमधील सर्वांत हिट चित्रपट मानले जाते.

सैफने नकार दिल्याने सलमान खान चमकला सैफने अनेक चित्रपट सोडले असले तरी डीडीएलजेशिवाय त्याला सर्वांत जास्त दुःख झालं असेल ते म्हणजे ‘कुछ कुछ होता हैं’ या चित्रपटाचे. या चित्रपटात त्याला ऑफर होती; परंतु नकारानंतर सलमान खानने त्याची जागा घेतली. सलमान खान आणि शाहरुख खान या दोघांनाही या चित्रपटाद्वारे जबरदस्त लोकप्रियता मिळाली. हे भारतीय चित्रपटातील सर्वाधिक लोकप्रिय
चित्रपटांमध्येदेखील गणले जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER