साई मंदिरातील देणगीत 180कोटी कमी

Sai temple

अहमदनगर : कोरोनाच्या संकटामुळे (Corona crises) मार्च महिन्यापासून श्री साईबाबांचे (Sai temple) समाधी मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. 17 मार्च ते 31 ऑगस्टपर्यंत साईभक्तांकडून विविध प्रकारे 20 कोटी 76 लाख 54 हजार 151 रुपयांची देणगी संस्थानला मिळाली. मागील वर्षी याच कालावधीत 203 कोटी 37 लाख 71 हजार 795 रुपयांची देणगी संस्थानला प्राप्त झाली होती. मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 182 कोटी 61 लाख 17 हजार 644 रुपयांच्या देणगीची घट झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली.

देश व राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन केले आहे. संस्थानने 17 मार्चपासून साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले आहे. मागील वर्षी 17 मार्च ते 31 ऑगस्ट या कालावधीत दक्षिणापेटीद्वारे साईभक्तांकडून 75 कोटी 29 लाख 78 हजार 927 रुपये देणगी संस्थानला प्राप्त झाली होती. मात्र, यावर्षी मंदिर बंद असल्याने 17 मार्च ते 31 ऑगस्ट दरम्यान दक्षिणापेटीद्वारे साईभक्तांकडून कोणतीही देणगी प्राप्त झाली नसल्याचे बगाटे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER