‘मेजर’मधील सई मांजरेकरचा फर्स्ट लुक झाला रिलीज

Maharashtra Today

बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीतील नामवंत निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता महेश मांजरेकरची (Mahesh Manjrekar) मुलगी सई मांजरेकर (Saiee Manjrekar) बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र याचवेळी ती साऊथच्या सिनेमातही काम करू लागली आहे. वडिलांच्याच काकस्पर्श सिनेमात काम करणाऱ्या सईला बॉलिवूडमध्ये सलमान खानने महेश मांजरेकरसाठी ‘दबंग ३’ मध्ये तिला नायिकेची भूमिका साकारण्याची संधी दिली होती. हा सिनेमा हिट झाला पण सईकडे म्हणावे तसे सिनेमे आले नाहीत. त्यामुळे तिने साऊथकडे मोर्चा वळवला आहे. साऊथमध्ये तयार होणाऱ्या ‘मेजर’ सिनेमात ती नायिकेच्या रुपात दिसणार असून या सिनेमातील तिचा फर्स्ट लुक नुकताच रिलीज करण्यात आला. स्वतः सईनेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा फर्स्ट लुक शेअर केला आहे.

२६-११ ला मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात (Mumbai Attacks) मेजर उन्नीकृष्णन (Major Unnikrishnan) शहीद झाले होते. मेजर उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर ‘मेजर’ नावाचा सिनेमा तयार होत असून यात सई मेजर उन्नीकृष्णची प्रेमिका आणि नंतर पत्नीची भूमिका साकारीत आहे. मेजरची भूमिका अदिवी सेश (Adivi Sesh) साकारत असून याची निर्मिती महेश बाबू (Mahesh Babu) आणि सोनी पिक्चर्स (Sony Pictures) करीत आहेत. या सिनेमाबाबत आम्ही तुम्हाला वेळोवेळी माहिती देत आलोच आहोत. या सिनेमाची देशभरात चर्चा असून हा सिनेमा कधी रिलीज होतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. सिनेमात मेजर उन्नीकृष्णन यांच्या धाडसासोबतच त्यांची आणि त्यांची पत्नी ईशा यांची प्रेमकथाही सादर करण्यात येणार आहे. सईच्या या फर्स्ट लुकमध्ये ती शाळकरी गणवेशात दिसत असून नायक अदिवी सेश याच्याकडे मोठ्या प्रेमाने पाहाताना दिसत आहे. या फोटोसोबत सईने लिहिले आहे, ‘त्याला प्रेमाबाबतही तेवढेच प्रेम आहे जेवढे देशाबाबत आहे.’ यासोबतच तिने सिनेमाचा चीझर १२ एप्रिल रोजी रिलीज केला जाणार असल्याची माहितीही दिली आहे. सई या सिनेमात १६ ते २८ वर्षाच्या मुलीची भूमिका साकाताना दिसणार आहे. या सिनेमासाठी सईने तेलुगु शिकल्याचेही सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर तिने स्वतःचे डायलॉग्ज स्वतःच म्हटल्याचेही बोलले जात आहे.

या सिनेमात अदिवि शेषसोबत शोभिता धुलिपाला आणि प्रकाश राज यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा यावर्षी २ जुलै रोजी रिलीज करण्याची योजना आखण्यात आलेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button