शिर्डीत साईबाबा मंदिरासमोर मनसेचे आंदोलन

open-sai-babas-temple-mnss-aggressive-agitation-in-shirdi-

मुंबई : कोरोनाचा (Corona virus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. गेल्या सहा महिन्यांसपासून राज्यातील मंदिरे अद्यापही बंद आहेत. केंद्राने सूचना दिल्यानंतरही राज्यातील मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आता शिर्डीतील साईबाबांचे मंदिर (Sai-baba-temple) उघडण्यासाठी मनसेचे आंदोलन (MNS allegation) केले.

शिर्डीचे साई मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करा, संस्थान कर्मचाऱ्यांचा वेतन कपातीचा निर्णय मागे घ्या, या मागणीसाठी आज मनसेच्यावतीने शिर्डीत आंदोलन करण्यात आले. मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे.

बाळा नांदगावकर यांनी साईबाबांना साष्टांग दंडवत घातले आणि मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले व्हावे आणि संस्थान कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा निर्णय मागे घ्यावा, असं साकडं साईबाबांना घातलं.

साईमंदिर खुले करा, अन्यथा आम्ही स्वतः खुले करून मंदिरात प्रवेश करू, असा इशारा मनसेनं दिला होता. त्यामुळे साई मंदिराच्या परिसरात सकाळपासूनच पोलीस प्रशासनाने संस्थानची सुरक्षा व्यवस्था वाढवली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER