साईबाबा! कोरोना महामारीचे संकट समूळ नष्ट कर : हसन मुश्रीफ यांचे साईचरणी साकडं

Hasan Mushrif

अहमदनगर : साईबाबा! संपूर्ण जगातील कोरोना (Corona) महामारीचे संकट समूळ नष्ट कर आणि समस्त मानवजातीला गतजीवन जगण्याचा आनंद पूर्ववत मिळू दे, असे साकडे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी शिर्डीच्या साईचरणी घातलं. आज गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता मंत्री हसन मुश्रीफ यांनी श्री. साईबाबांचे दर्शन घेत मानवजातीच्या कल्याणाची ही प्रार्थना केली.

सकाळी साडेआठ वाजता मुंबईवरून विमानाने निघालेले मंत्री श्री. मुश्रीफ नऊ वाजून दहा मिनिटांनी शिर्डी विमानतळावर पोहोचले. साडेनऊ वाजता मंदिरात पोहोचून त्यांनी श्री साईबाबांचे दर्शन घेतले.

यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, यापूर्वी अहमदनगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दोनवेळा शिर्डीमध्ये आलो होतो. परंतु; कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने दर्शन झाले नव्हते. मी भाग्यवान आहे, आज दर्शन झाले आणि धन्य वाटले. साईबाबांनी धर्म -पंथ, जात- पातीच्या पलीकडे जाऊन मानवजातीच्या उद्धारासाठी केलेले कार्य महान आहे. कोरोना महामारीमुळे माणसा-माणसातील नातेसंबंध दुरावले असून संपूर्ण जगाचीच ताटातूट झाली आहे. कोरोना कोरोना महामारीचे हे मळभ दूर होऊन मानवाला गतजीवन जगण्याचा आनंद मिळण्यासाठी श्री. साईचरणी लीन होऊन साकड घातलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER