धुळे महानगरपालिकेवर भगवा फडकवणारच; शिवसेना मंत्र्याचा निर्धार

Dhule Municipal Corporation - Abdul Sattar

धुळे : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराच्या (Ram Mandir) निर्माणावरून सध्या सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. राम मंदिराच्या निधी संकलनावरून विरोधक भाजपला लक्ष्य करत आहेत. यावरूनच एकेकाळी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही भाजपकडून राज्यात राबवण्यात येत असलेल्या निधी संकलन मोहिमेवरून लक्ष्य केले आहे. शिवसेना (Shiv Sena) आमदार अब्दुल सत्तार यांनी लक्ष्य केले. भाजपचे नेते राम मंदिराच्या निधी संकलनाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे दानशूर व्यक्ती आहेत. इतरांसारखे भिकारी नाहीत, अशा शब्दांत अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी भाजपवर (BJP) घणाघाती आरोप केला.

ते रविवारी धुळ्यात आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या संकल्प मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपला धारेवर धरले. भाजपने विश्वासघात केला नसता तर आज राज्यात युतीची सत्ता असती. भाजप हा गरिबांचा नव्हे तर उद्योगपतींचा पक्ष बनला आहे. राम मंदिराच्या नावाने निधी संकलन करणाऱ्या भाजपने बाळासाहेब ठाकरे यांचे आभार मानायला हवेत, अशी बोचरी टीकाही सत्तार यांनी केली.

महाविकास आघाडीचे सरकार पडण्याची वाट पाहणारे हँग झाले आहेत. गेल्या १६ महिन्यांपासून सरकार आहे त्या ठिकाणी आपले काम व्यवस्थित करत आहेत. माझं नाव सत्तार आहे, मी सत्तेतच राहणार. तसेच आगामी काळात ग्रामपंचायतींच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. आगामी निवडणुकीत धुळे महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. धुळे महानगरपालिकेत शिवसेनेचे ५५ नगरसेवक निवडून येतील. शिवसैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याला शिव दरबार भरवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्याच्या वाचाळ नेत्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संयमी असून, कमी बोलून कृतीवर विश्वास ठेवणारे व्यक्ती आहेत. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. लॉकडाऊन दरम्यान मंदिरे सुरू करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली होती. मात्र त्यावेळी धर्म म्हणजे केवळ मंदिर नाही, अशा प्रकारे परिस्थिती उद्धव ठाकरेंनी हाताळल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुकही केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER