महाबळेश्वर येथे केशर लागवड प्रयोग यशस्वी : कृषी विभागाव्हा दावा

Saffron Planting Experiment at Mahabaleshwar Successful

सातारा : महाबळेश्वर (Mahabaleshwar) भागात केशर (Saffron) लागवड करण्यात आली असून हा प्रयोग यशस्वी झाल्याने आता या भागात आणखीन काही शेतकऱ्यांकडून ही केशर लागवड करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. त्यामुळे आता महाबळेश्वरची ओळख आता स्ट्रॉबेरी उत्पादनाबरोबर केशर उत्पादनाचा भाग म्हणून होण्याची शक्यताआहे.

भारतात केवळ काश्मिरमध्ये केशरचे उत्पादन घेतले जाते. ते ही श्रीनगर येथील पंपुर आणि किस्टवाड या गावांमध्येचे याचे मुख्यत: उत्पादन घेतले जाते. मागील वर्षी जवळपास ४५० केशरचे कंद (मुळ) हे मागविण्यात आले होते. त्यानुसार महाबळेश्वर मधील तीन शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यात याची लागवड आपल्या शेतात केली होती. कृषी विभागातर्फे नाविन्यपूर्ण प्रयोग म्हणून करण्यात आले. त्यापैकी तीन कंद हे चांगले फुटले असुन त्याला केशर आले आहेत. आता ते वाळविण्याची प्रक्रिया सुरू असुन उर्वरित कंद देखिल लवकरच केशर फुटण्याच्या मार्गावर आहेत.

या प्रयोगावरून हे उत्पादन महाबळेश्वरसारख्या आपल्या भागात देखिल घेऊ शकते हे सिध्द झाले असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. पहिला प्रयोग यशस्वी झाल्याने आता आणखीन १० शेतकरयांतर्फे या केशरच्या कंदाची लागवड करण्यात येणार आहे. एखादा वेगळा व नाविन्यपुर्ण प्रयोग राबविण्याच्या दृष्टीने ही केशर लागवड करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER