केशर पिस्ता कुल्फी

Kesar Pista Kulfi

सर्वांना आवडणारी कुल्फी आता कमीच मिळते. गावा मध्ये आधी गल्लोगल्लीत कुल्फी वाले काका कुल्फी घेऊन फिरायचे. आता तस होत नाही. आता तर मार्केट मध्ये जाऊन कुल्फी घेऊन आणावी लागते आणि घरी येत पर्यंत त्या कुल्फीच पूर्ण मिल्क शेक होऊन जातो. हि मेहनत करावी नाही म्हणून घरीच बनवा कुल्फी. ते पण साधी कुल्फी नाही तर केशर पिस्ता कुल्फी….हे कुल्फी बनवन अगदी सोप्प आहे.

साहित्य:-
  • अर्धा लिटर दूध
  • १ कप साखर
  • १ वाटी खवा
  • केशर
  • १ वाटी पिस्ता
  • २ टी स्पून काॅॅर्नफ्लाॅॅवर पावडर
  • वेलची पूड

कृती:- सर्वात आधी दुधाला गरम करण्यासाठी ठेवावे. यात साखर, खवा टाकून घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावे. त्यानंतर केशर आणि पिस्ता टाकून ५ मिनिट परत शिजवावा. आता वेगळ्या एका वाटी मध्ये थोड गरम दुधात काॅॅर्नफ्लाॅॅवर पावडर मिक्स करून हे मिश्रम कुल्फी च्या मिश्रणात मिक्स करावे आणि वेलचीपूड टाकून ५ मिनिट परत शिजवावे. या मिश्रणाला थंड करून कुल्फी मोल्ड किंवा प्लास्टिक च्या भांड्यामध्ये टाकून रात्रभर फ्रिज मध्ये ठेवावे. तुमची केशर पिस्ता कुल्फी तयार…