भगवा रंग आणि धनुष्यबाण, दिशा पटानीच्या ट्विटने चर्चेला उधाण

Happy Dussehra - Disha Patani - Aaditya Thackeray

मुंबई : रविवारला शिवसेनेचा (Shiv Sena) दसरा मेळावा पार पडला. नेहमीप्रमाणे तो शिवाजीपार्कवर (Shivaji Park) झाला नाही, तर कोरोनामुळे (Corona) शिवसेनेला दसरा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये घेण्यात आला. याची मेळाव्याची चर्चा असतानाच अभिनेत्री दिशा पटानीने दिलेली दसऱ्याची शुभेच्छा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती.

दिशा पटानी (Disha Patani)ने ट्विटरवरुन शेअर केलेला फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. दिशाने दसऱ्यानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरवरुन दिशाने एका धनुष्यबाणाचा फोटो शेअर केला आहे. आणि हॅपी दसरा असं म्हटलं आहे.

भगव्या रंगातल्या धनुष्यबाणाचा आणि शिवसेनेचा खास संबंध आहे. तसाच संबंध दिशा पटानी आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचादेखील आहे. आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी हे अनेक वर्षांपासून एकमेकांचे खूप चांगले मित्र असून दोघेही अनेकदा दिसूनही आलेत. विशेष म्हणजे दिशा आणि आदित्य यांचा वाढदिवस देखील एकाच दिवशी असतो. जेव्हा आदित्य ठाकरेंची मंत्रिमंडळात नियुक्ती झाली होती तेव्हा दिशाने आदित्य ठाकरेंचं (Aaditya Thackeray) कौतुकही केलं होतं. “महाराष्ट्राला एका तरुण नेत्याची गरज होती आदित्य ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. आणि त्यांच्या रुपाने महाराष्ट्राला एक तरुण, तडफदार नेतृत्व मिळालं आहे” असं दिशाने म्हटलं होतं.

दसऱ्यानिमित्त दिशाने केलेलं ट्वीट बरेच संकेत देऊन जाते. दिशाने ट्वीटमधून भगव्या रंगाचा धनुष्यबाण दाखवत दसऱ्याच्या शुभेच्छा देणं म्हणजे निव्वळ योगायोग आहे की, त्यामागे काही खास कारण आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER