‘तुझ्यात अपवित्र आत्मा आहे’ असं सांगत भोंदूबाबाचा गायिकेवर बलात्कार

rape-case

मुंबई :- शरीरातील अपवित्र आत्मा असल्याने व्यावसियक वृद्धी होत नसल्याचे सांगून एका भोंदूने मुंबईतील एका २१ वर्षीय गायिकेवर बलात्कार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भोंदूबाबाला अटक केली आहे.

रिमिक्स अल्बम गायिका चारकोप येथे संगीतकार पतीसह भाड्याच्या घरात राहते. तसेच, आरोपी उमेश पांडे हासुद्धा चारकोपचाच रहिवासी आहे. काही महिन्यांपूर्वी पीडिता आणि तिचा पती गृहप्रवेशासाठी ज्योतिषाच्या शोधात होते.

तसेच, त्यांची व्यावसायिक पातळीवर भरभराट होत नव्हती. त्यांच्या मित्राने त्यांची ओळख उमेश पांडे नामक व्यक्तीशी करून दिली. पीडिता आणि तिच्या पतीने रविवारी पांडेला पूजेसाठी घरात बोलावलं. पूजेचं साहित्य आणण्यासाठी पती बाहेर गेला. तेव्हा, ‘तुझ्या शरीरात एक अपवित्र आत्मा आहे, त्यामुळे तुला व्यावसायिकदृष्ट्या अपयश येत आहे.

शरीरातील अपवित्र आत्मा बाहेर काढण्यासाठी तुला नग्न व्हावं लागेल’ असं आरोपीने पीडितेला सांगितलं.

घडलेला प्रकार संशयास्पद वाटल्यामुळे पीडित तरुणीने दुसऱ्या दिवशी आपल्या पतीला ही गोष्ट सांगितली. त्यानंतर दोघांनी चारकोप पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकून मंगळवारी कोर्टासमोर हजर केलं. कोर्टाने आरोपी भोंदूबाबाला पोलिस कोठडी सुनावली आहे.

नागपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार