नवाब मालिकांनी मराठा समाजाला शहाणपणा शिकवू नये, सदाभाऊ खोत कडाडले

सांगली : नवाब मलिक (Nawab Malik) तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) गुलाम आहात. त्यामुळे आपण मराठा समाजाला शहाणपणा शिकवण्याचे काम करू नये, असा इशारा माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी दिला.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर केलेल्या टीकेवर उत्तर देताना खोत यांनी मालिकांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, मराठा आरक्षणावर मलिक सतत काही न काही बोलत असतात. पण मलिक यांना एक प्रश्न विचारायचा आहे, राज्यात पंधरा वर्षे तुमचे सरकार होते. त्यावेळी तुम्ही काय शेनी लावायला रानात गेला होता का ?. तुम्ही मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही? मलिक यांची मला जाणीव आहे, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाम आहात. गुलामाच्या बोलण्यास फारसे महत्व दिले जात नाही. त्यामुळे तुमच्या बोलण्याला आम्ही फारसे गांभीर्याने घेणार नाही. परंतु मराठा समाजामध्ये दुही निर्माण करून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असाल, तर मराठा समाज हा लढवय्या आहे. जी गोष्ट त्याला मिळत नाही. ती तो हक्काने, लढाई करून प्राप्त घेतो. त्यामुळे तुमच्यासारख्या गुलामाने मराठा समाजाला शहाणपणा शिकावण्याच काम करू नये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button