सदाभाऊ खोत राजू शेट्टी पुन्हा सोबत येण्याचे संकेत

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti)आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खो ( Sadabhau Khot)त पुन्हा एकत्र येण्याचे संकेत आहेत. याबाबत सदाखाऊ खोत म्हणालेत, राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो. आमची विचारधारा एकच आहे. केवळ काही मुद्द्यांवरून मतभेद झालेत.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आमच्यात काही वाद झाले. आमच काही शेताच्या बांधावरचं भांडण नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच आमची भूमिका आहे. रयत क्रांती संघटनेच्या कार्यकारणीत आम्ही शेतकऱ्यांना एफआरपी एकरकमी मिळावा, अशी मागणी केली. स्वाभिमानीचीदेखील तीच मागणी आहे. चांगल्याला चांगली म्हणण्याची दानत आमच्यात आहे. आमच आणि त्यांचं मत एकच आहे.

तुमची आणि राजू शेट्टींची मागणी आणि भूमिका एकच असली तर मग एकत्र येणार का,याच्या उत्तरात खोत म्हणालेत, राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो. काही मुद्द्यांवरून आमचे मतभेद झाले पण आमची विचारधारा एकच आहे. राजू शेट्टी प्रस्थापितांच्या बाजूला गेल्याने आमच्यात दरी निर्माण झाली.

सदाभाऊ भाजपावर नाराज?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडून खोत यांनी रयत क्रांती संघटना उभारली. राजू शेट्टींच राजकारण कमकुवत करण्यासाठी भाजपाने त्यांच्याशी जवळीक साधली. मात्र आता जिल्ह्यातल्या राजकारणात त्यांना डावलल जात असल्याचा आरोप त्यांचे कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे खोत भाजपावर नाराज असल्याची चर्चा आहे. केंद्राने आणलेल्या शेतकरी कायद्यांवरही खोत यांनी टीका केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER