करंट्या, अपशकुनी लोकांचे सरकार आले आणि मराठा आरक्षण रद्द झाले – सदाभाऊ खोत

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्यावरून आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार आणि अशोक चव्हाण यांच्यावर टीकेचे बाण सोडले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे  सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. मात्र हे करंटे, अपशकुनी लोकांचे सरकार आल्यानंतर मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले. राज्य सरकारने कोर्टात भक्कमपणे बाजू मांडली नाही. विरोधी पक्षांना सोबत घेतलं नाही, वकिलांना मार्गदर्शन केलं नाही. गायकवाड समितीमधील महत्त्वाचे पुरावे जोडले नाही, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडताना सदाभाऊ खोत म्हणाले, आपण खूपच हुशार आहात. तुमचा ‘आदर्श’ स्वीकारण्यासारखा आहे. दोन वर्षे अफूच्या गोळ्या खाऊन काम करत होते का? सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकार पुन्हा गेले. राज्य सरकार का पुन्हा कोर्टात गेले नाही? असा सवाल करत सरकारमधील मराठा समाजाच्या नेत्यांना आरक्षण द्यायचे नव्हते. अशोक चव्हाण वेड्याच्या रुग्णालयात जायच्या अवस्थेत आले आहेत. अशोक चव्हाण यांना देण्यात आलेल्या जबाबदारीवरून मुक्त करा. मुख्यमंत्र्यांनी प्रस्थापित मराठा समाजाच्या नेत्याला उपसमितीचा अध्यक्ष करू नये. या धनदांडग्या नेत्यांना या समितीवर ठेवू नका, अशी मागणीही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button